बॅडमिंटन खेळता खेळता अचानक चिंकी-मिंकी करू लागल्या डान्स, व्हायरल होतोय व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 18:42 IST2021-10-04T18:42:08+5:302021-10-04T18:42:33+5:30

सुरभी आणि समृद्धी या दोघांना आज लोक त्यांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांचे स्क्रीनवरील नाव चिंकी आणि मिंकीने जास्त ओळखतात.

Suddenly, while playing badminton, I started doing chinky-minky dance, the video is going viral | बॅडमिंटन खेळता खेळता अचानक चिंकी-मिंकी करू लागल्या डान्स, व्हायरल होतोय व्हिडीओ

बॅडमिंटन खेळता खेळता अचानक चिंकी-मिंकी करू लागल्या डान्स, व्हायरल होतोय व्हिडीओ

आपल्या वेगळ्या शैलीने सर्वांच्या मनात घर करणाऱ्या टेलिव्हिजनवरील चिंकी आणि मिंकी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. कपिल शर्मा शोमधून या जुळ्या बहिणी खूप चर्चेत आल्या आहे. सुरभी आणि समृद्धी या दोघांना आज लोक त्यांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांचे स्क्रीनवरील नाव चिंकी आणि मिंकीने जास्त ओळखतात. त्या दोघी चांगल्या कॉमेडियन सोबत उत्तम डान्सर आहे. त्यांचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या दोघी बॅडमिंटन कोर्टात दिसत आहेत.

बॅडमिंटन कोर्टातील व्हिडीओ सुरभी आणि समृद्धीने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले की, 'गोइंग विथ द ट्रेंड इन द बैडमिंटन कोर्ट'. या व्हिडीओत त्या दोघांच्या हातात बॅडमिंटन आहे आणि त्या छान मुव्ह्ज करताना दिसत आहेत.

दोघींनी स्पोर्ट्स वेअर परिधान केले आहे आणि केसांचा पोनीटेल बनवला आहे. या गेटअपमध्ये दोघी स्टनिंग दिसत आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे चाहते चिंकी मिंकीचे कौतुक करत आहेत. तासाभरात या व्हिडीओला साठ हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. फार कमी कालावधीत चिंकी मिंकीला खूप लोकप्रियता मिळाली आहे. 


सुरभी आणि समृद्धी म्हणजेच चिंकी आणि मिंकी सध्या सब टिव्हीवरील मालिका हिरोमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्या स्वीटी आणि मिठीच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. या जुळ्या बहिणींनी द कपिल शर्मा शोमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते आणि तिथूनच त्यांना लोकप्रियता मिळाली. 

Web Title: Suddenly, while playing badminton, I started doing chinky-minky dance, the video is going viral