"अचानक मालिकेतून काढून टाकलं आणि...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:57 IST2024-04-02T11:56:52+5:302024-04-02T11:57:29+5:30

Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव हिला मालिका विश्वात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल नुकतेच तिने मुलाखतीत सांगितले.

"Suddenly removed from the series and...", shocking revelation of the actress of Ai Khe Kya Karte fame | "अचानक मालिकेतून काढून टाकलं आणि...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

"अचानक मालिकेतून काढून टाकलं आणि...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेच्या कथानकासोबत यातील कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. या मालिकेतील माया या पात्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ही भूमिका अभिनेत्री अक्षया गुरव (Akshaya Gurav) हिने निभावली होती. तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. मात्र हे पात्र मालिकेत फार दिवस टिकले नाही. काही दिवसातच तिला मालिका सोडावी लागली.दरम्यान आता अक्षयाला मालिका विश्वात आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.

अभिनेत्री अक्षया गुरव हिला मालिका विश्वात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल नुकतेच तिने मुलाखतीत सांगितले. हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिला मधल्या काळात तू इंडस्ट्रीपासून दूर का होतीस, असे विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, हे खरंय. मी सलग किंवा एकापाठोपाठ एक चित्रपट केले नाहीत. मात्र जी काही कामे केली ती उत्तम होती. या सर्व भूमिका वेगळ्या धाटणीच्या होत्या आणि मी त्याची निवड केली होती. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाईट काळ आणि संघर्षाचा काळ असतो. तसाच माझ्याही आयुष्यात हा काळ आला होता. या काळात माणूस स्वत:च्या पायावर उभा राहायला शिकतो. 

मी मिळेल ते काम करण्यासाठी तयार होते...

अक्षया पुढे म्हणाली की, मागील वर्षी माझ्या नवऱ्याचे ऑपरेशन झाले होते. आम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. त्यामुळे त्याचे ऑपरेशन झाल्यानंतर जवळपास ५ ते ६ महिने मी घरी होते. त्या काळात माझ्याकडे काही कामच नव्हते. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी लोकांकडे काम मागत होते. मी त्यांना सांगायचे की, ‘प्लीज मला काम द्या.’ त्या काळात मी मिळेल ते काम करण्यासाठी तयार होते. कारण, प्रत्येक कलाकारासाठी काम हे महत्त्वाचे असते. 

त्या रोलसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची केली निवड

त्या दरम्यान मला एका मालिकेची ऑफर आली होती. मोठे चॅनेल असल्यामुळे मी त्या चॅनेलचे नाव घेणार नाही. त्यांनी मला फायनल केले, लूक टेस्ट, मॉक शो झाला, संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि अचानक आदल्या रात्री त्यांनी मला फोन करून सांगितले की, आम्ही तुझ्याबरोबर काम करणार नाही. आम्ही त्या रोलसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली आहे, असे अक्षयाने सांगितले. या घटनेनंतर अक्षयाला खूप वाईट वाटले होते. मला ज्या शोमधून काढलं, दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं. तो शो आता बंद होतो आहे, असेही तिने सांगितले.
 

Web Title: "Suddenly removed from the series and...", shocking revelation of the actress of Ai Khe Kya Karte fame