अचानक लॉटरी लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 17:30 IST2016-08-27T12:00:56+5:302016-08-27T17:30:56+5:30

प्रत्येक कलाकाराला आपल्याला चित्रपटात अथवा मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळावी असे वाटत असते. पण प्रमुख भूमिका मिळणे हे तितकेसे ...

Suddenly the lottery took place | अचानक लॉटरी लागली

अचानक लॉटरी लागली

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">प्रत्येक कलाकाराला आपल्याला चित्रपटात अथवा मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळावी असे वाटत असते. पण प्रमुख भूमिका मिळणे हे तितकेसे सोपे नसते. काही कलाकारांना तर आयुष्यभर दुय्यम भूमिकेवरच समाधान मानावे लागते. पण सध्या मराठी मालिकांमध्ये नवा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये छोट्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांनाही सध्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. छोट्याशा भूमिकेत आपली अभिनयक्षमता सिद्ध केल्यामुळेच या कलाकारांना प्रमुख भूमिकेत झळकायला मिळत आहे. 
 
ओमप्रकाश शिंदे
ओमप्रकाश शिंदे सध्या खुलता कळी खुलेना या मालिकेत डॉ. विक्रांत दळवी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ओमप्रकाशने याआधी का रे दुरावा या मालिकेत काम केले होते. या मालिकेत ओमप्रकाशची एंट्री मालिका संपायच्या काही भागांपूर्वीच झाली होती. या मालिकेत ओमप्रकाशची भूमिका ही प्रमुख नसली तरी त्याने त्याच्या छोट्याशा भूमिकेतही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्याच्या या अभिनयक्षमतेमुळेच त्याला आता मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळालीय.



 
 
अनिता दाते 
एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या स्पृहा जोशीच्या मैत्रिणीची भूमिका अनिता दातेने साकारली होती. अनिताच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले असले तरी या भूमिकेने अनिताला तितकी प्रसिद्धी मिळवून दिली नव्हती. सध्या अनिता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी तिच्या अभिनयाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.

 
ऋतुजा बागवे
तू माझा सांगाती या मालिकेत ऋतुजाने रखमाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील ऋतुजाची भूमिका ही काही भागांपुरताच मर्यादित होती. या मालिकेनंतर तिला नांदा सौख्यभरे या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिच्या या पहिल्याच प्रमुख भूमिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. 



 
 
जुई गडकरी
पुढचं पाऊल या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारणारी जुई गडकरी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. जुई सध्या पुढचं पाऊल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असली तरी तिने याआधी माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुजवीन सख्या रे, बाजीराव मस्तानी यांसारख्या मालिकेत छोट्या भूमिका साकारल्या आहेत. 

 
तितिक्षा तावडे
तितिक्षा तावडेला सरस्वती या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तितिक्षाची सरस्वती ही पहिलीच मालिका आहे. याआधी तिने सिंघम या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले होते. 

Web Title: Suddenly the lottery took place