तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावेचा मुलगा साकारतोय ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 19:40 IST2019-05-01T19:37:55+5:302019-05-01T19:40:52+5:30

मल्हारने सुबोध आणि स्वप्निलची मुख्य भूमिका असलेल्या फुगे या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा आपल्याला मल्हारला अभिनय करताना पाहायला मिळत आहे. 

Subodh Bhave's son in zee marathi Tula Pahate Re | तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावेचा मुलगा साकारतोय ही भूमिका

तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावेचा मुलगा साकारतोय ही भूमिका

ठळक मुद्दे‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. सध्या या मालिकेची कथा काही वर्षं मागे गेलेली दाखवण्यात आली आहे. या मालिकेत सध्या जयदीपच्या भूमिकेत आपल्याला चिमुकल्या मल्हार भावेला पाहायला मिळत आहे. 

सुबोध भावेला कान्हा आणि मल्हार अशी दोन मुले आहेत. त्याच्या दोन्ही मुलांना अभिनयाची आवड आहे. कान्हाने उबुंटू या पुष्कर श्रोतीच्या चित्रपटात काम केले होते तर त्याचा मुलगा मल्हारने सुबोध आणि स्वप्निलची मुख्य भूमिका असलेल्या फुगे या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा आपल्याला मल्हारला अभिनय करताना पाहायला मिळत आहे. 

मल्हार सध्या दुसऱ्या कोणाच्या नव्हे तर सुबोध भावेच्या तुला पाहते रे या मालिकेत झळकत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. सध्या या मालिकेची कथा काही वर्षं मागे गेलेली दाखवण्यात आली आहे. या मालिकेत सध्या जयदीपच्या भूमिकेत आपल्याला चिमुकल्या मल्हार भावेला पाहायला मिळत आहे. 

तुला पाहते रे या मालिकेत नुकतीच विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची एंट्री झाली असून तिची एंट्री कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. शीर्षक गीतात सावलीतून दिसणारा हा चेहरा आता सगळ्यांच्या शेवटी समोर आला. अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही भूमिका साकारत असून तिचा या मालिकेतील लूक खूपच छान आहे.

मालिकेतील एंट्रीबद्दल बोलताना शिल्पा सांगते, "मला ही माझ्या एंट्रीबद्दल उत्सुकता लागली होती आणि सगळेजण मला विचारात होते. पण जर मी त्यांना सांगितलं असते की, मला ही याबाबत माहिती नव्हतं, तर नक्कीच कोणाचाही यावर विश्वास बसला नसता. मी सुरुवातीचे आणि मधले काही भाग मला जसे जमेल तसे पाहिले आहेत. इशाचा भाग मी जास्त न बघण्याचा प्रयत्न केला, कारण कथानकाला मला नव्याने सामोरं जायचं आहे. त्यामुळे आधीच्या इशाच्या प्रसंगांचा प्रभाव राजनंदिनीच्या प्रसंगांवर नको पडायला म्हणून हा प्रयत्न होता." 

सुबोधसोबत पहिल्यांदाच काम करण्याच्या अनुभवाविषयी शिल्पा सांगते, "सुबोध सोबत मी पहिल्यांदाच काम करतेय आणि तो माझा अत्यंत आवडता नट आहे. तो टॅलेंटेड तर आहेच आणि त्याची शिस्त, त्याची वैचारिकता मी त्याच्या कामातून बघत आली आहे. त्याच्यासोबत काम करण्याची उत्सुकता असण्यापेक्षा त्याला जवळून काम करताना मला बघायचं होतं आणि ती इच्छा तुला पाहते रे या मालिकेमुळे पूर्ण झाली."

Web Title: Subodh Bhave's son in zee marathi Tula Pahate Re