सुबोध भावेची ही इच्छा झाली पूर्ण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:04 IST2022-07-26T13:03:54+5:302022-07-26T13:04:41+5:30

'बस बाई बस' या कार्यक्रमातून सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत.सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

Subodh Bhave has been fulfilled His Wish, Read Details | सुबोध भावेची ही इच्छा झाली पूर्ण, जाणून घ्या

सुबोध भावेची ही इच्छा झाली पूर्ण, जाणून घ्या

आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी सुबोधने रसिकांची मनं जिंकली आहेत. आता तो लवकरच नवीन भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.'बस बाई बस' या कार्यक्रमातून सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत.सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे.

अशा प्रकारचा कार्यक्रम सुबोध पहिल्यांदाच करतोय त्यामुळे हा कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना सुबोध म्हणाला, "मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे पण संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. 

त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळाली तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला." या कार्यक्रमात आता पर्यंत चित्रित झालेल्या भागांमधील एक किस्सा सांगताना सुबोध म्हणाला, "अमृता फडणवीस जेव्हा मंचावर आल्या होत्या तेव्हा कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी तो भाग न चुकता बघावा पण त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो आणि माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला."

Web Title: Subodh Bhave has been fulfilled His Wish, Read Details