जिद्दी तरुणीची कहाणी 'तमन्ना' वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 12:03 IST2018-08-20T12:03:29+5:302018-08-20T12:03:48+5:30

मोदक मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि दीपिका श्रीवास्तव निर्मित आणि लकी शेख दिग्दर्शित 'तमन्ना' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The story of a stubborn woman in 'Tamanna' WebSeries | जिद्दी तरुणीची कहाणी 'तमन्ना' वेबसीरिजमध्ये

जिद्दी तरुणीची कहाणी 'तमन्ना' वेबसीरिजमध्ये

ठळक मुद्दे'तमन्ना' वेब सीरिज ऑक्टोबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मोदक मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि दीपिका श्रीवास्तव निर्मित आणि लकी शेख दिग्दर्शित 'तमन्ना' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचे चित्रीकरण नुकतेच पुण्यात पार पडले. मोदक मोशन पिक्चर्स या वेबसीरिजमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या वेबसीरिजची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी या वेबसीरिजचे कलाकार व इतर मंडळी उपस्थित होते.  

'तमन्ना' वेबसीरिजमध्ये एका जिद्दी मुलीची कथा रेखाटण्यात आली आहे. तमन्नाला तिची परिस्थिती तिच्या व्यवसायात सशक्त बनवू शकते ? तिची सकारात्मक वृत्ती आणि प्रचंड आत्मविश्वासामुळे तिला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहण्यासाठी अंधाऱ्या अवस्थेतून ती बाहेर येईल ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला ही सीरिज पाहूनच मिळतील. समाजात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी ही सीरिज प्रेरणादायी ठरेल.
'तमन्ना' या सिरीजमध्ये अभिमन्यु काक आणि अनन्या डे हे मुख्य भूमिकेत आहेत. अभिमन्यू हा रेडिओवरती आरजे म्हणून या आदी त्याने काम केले आहे. तो वयाच्या १६ व्या वर्षी सर्वांत लहान वयात आरजे झाला होता. अनन्या डे ही एक बंगाली अभिनेत्री आहे. क्रिएटिव्ह हेड अजित घोरपडे, मार्केटिंग आकर्षण कटीयार हे पाहत आहेत.देवांश हा दिल्लीचा एक प्रसिद्ध डीजे आहे आणि मुंबई संगीत महोत्सव २०१७ त्याने तो जिंकला आहे. मोदक मोशन यांच्यावतीने या सीरिज मधून देवांशला लॉन्च केले जात आहे.
मोदक मोशन पिक्चर्स या सिरीजमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत असून आगामी काळात मोदक मोशन कडून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली जाणार आहे असे मोदक मोशन पिक्चर्सकडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 'तमन्ना' ही वेबसीरिज ऑक्टोबर २०१८ च्या अखेरीस प्रदर्शित करण्यात येईल.

Web Title: The story of a stubborn woman in 'Tamanna' WebSeries