Birthday Special : अभिज्ञा भावे आणि मेहुल पैची लव्हस्टोरी आहे फिल्मी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 14:34 IST2021-03-13T14:34:01+5:302021-03-13T14:34:27+5:30

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेचा आज वाढदिवस आहे.

The story of the second marriage !, Abhidnya Bhave and Mehul Pai's love story is filmy | Birthday Special : अभिज्ञा भावे आणि मेहुल पैची लव्हस्टोरी आहे फिल्मी

Birthday Special : अभिज्ञा भावे आणि मेहुल पैची लव्हस्टोरी आहे फिल्मी

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मालिका आणि तिच्या ग्लॅमरस लूकमुळे अभिज्ञा नेहमीच चर्चेत असते. 

खरेतर सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अभिज्ञा एअर होस्टेस होती हे तर सर्वांनाच माहित आहे, पण यापूर्वी तिचे लग्न झाल्याचे खूपच कमी जणांना माहित आहे. २०१४ साली अभिज्ञा वरुण वैटिकरसोबत विवाहबंधनात अडकली होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिज्ञा भावे आणि मेहुल पैसोबत लग्न केले. त्या दोघांचे दुसरे लग्न असून त्यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे.

अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. १५ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.


अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

 


अभिज्ञाबद्दल सांगायचे तर तिला सर्वच ओळखतात. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे. ती ‘रंग माझा वेगळा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत शेवटची दिसली होती. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.

Web Title: The story of the second marriage !, Abhidnya Bhave and Mehul Pai's love story is filmy