​‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची अशी असणार आहे कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 10:51 IST2018-04-23T05:21:25+5:302018-04-23T10:51:25+5:30

‘स्टार प्लस’वर प्रेक्षकांना लवकरच एक नवी मालिका पाहायला मिळणार असून या मालिकेचा विषय खूपच वेगळा आहे. स्टार प्लस या ...

The story of 'Krishna Walks London' is going to be such a story | ​‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची अशी असणार आहे कथा

​‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची अशी असणार आहे कथा

्टार प्लस’वर प्रेक्षकांना लवकरच एक नवी मालिका पाहायला मिळणार असून या मालिकेचा विषय खूपच वेगळा आहे. स्टार प्लस या वाहिनीवर लवकरच ‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे.
कृष्णा चली लंडन या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये राधे आपली स्वत:ची माहिती देत असून त्याचा मित्र साजन ती मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राधेची ओळख जाणून घेण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारले जात आहेत. यात त्याचे ‘नाव’, ‘काम’, ‘आपल्या पायावर उभा आहे की नाही?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्याला देताना दिसत आहे. या प्रोमोच्या अखेरीस राधे आपली ही ओळख करून देणारा व्हिडिओ अनेक मुलींना पाठवतो आणि त्यासोबत एक प्रश्नही विचारतो, “है कोई नजर में?”
कृष्णा चली लंडन या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले असले तरी या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
येत्या उन्हाळ्याच्या सुटीत प्रेक्षकांना आपल्या भावी अर्धांगिनीचा शोध घेणारऱ्या राधेची निरागसता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडेल. अशा या स्वप्नाळू राधेच्या प्रेमात प्रेक्षक देखील पडतील अशी कृष्णा चली लंडन या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
कृष्णा चली लंडन या मालिकेत गौरव सारीन राधे ही मुख्य भूमिका साकारत असून एक दिवाना था या मालिकेत प्रेक्षकांना त्याला याआधी पाहायला मिळाले होते. या मालिकेतील भूमिकेपेक्षा त्याची राधे ही भूमिका खूपच वेगळी असणार आहे. 

Also Read : एक दीवाना था या मालिकेची टीम पडली या सदस्याच्या प्रेमात

Web Title: The story of 'Krishna Walks London' is going to be such a story