सृष्टी जैन म्हणते, माझ्या यशात रंगभूमीचा सिंहाचा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:43 IST2019-07-10T15:34:39+5:302019-07-10T15:43:15+5:30

‘स्टार भारत’वरील ‘एक थी रानी, एक था रावण’ या मालिकेच्या कथानकाला आतापर्यंत अनेक नाट्यपूर्ण कलाटण्या मिळाल्या आहेत.  नव्या कलाटणीनुसार या मालिकेत आता एका नव्या राणीचा प्रवेश होणार आहे.

Srishti Jain said drama is a big part of my success | सृष्टी जैन म्हणते, माझ्या यशात रंगभूमीचा सिंहाचा वाटा

सृष्टी जैन म्हणते, माझ्या यशात रंगभूमीचा सिंहाचा वाटा

‘स्टार भारत’वरील ‘एक थी रानी, एक था रावण’ या मालिकेच्या कथानकाला आतापर्यंत अनेक नाट्यपूर्ण कलाटण्या मिळाल्या आहेत.  नव्या कलाटणीनुसार या मालिकेत आता एका नव्या राणीचा प्रवेश होणार आहे. निर्मात्यांना अपेक्षित असलेल्या राणीची व्यक्तिरेखा ही नवी राणी साकारणार असून ही भूमिका नामवंत अभिनेत्री सृष्टी जैन रंगविणार आहे.

सृष्टी जैनला पहिल्यापासूनच अभिनयाची आवड होती आणि अगदी लहान असतानाच तिने अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला होता. सृष्टी सांगते, “मला नेहमीच कॅमेऱ्या पुढे उभं राहावंसं वाटत असे. माझ्या या आवडीबद्दल माझे कुटुंबीय सुरुवातीला साशंक होते, पण त्यांनी जेव्हा माझी अभिनयाबद्दलची आवड पाहिली, तेव्हा त्यंनी मला पूर्ण पाठिंबा दिला.”

“पुढे रंगभूमीने माझ्या आत्मविश्वासाला मोठी चालना दिली. अभिनयाचा पाया ही रंगभूमीच आहे, असं मला वाटतं. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात आल्यावर मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, पण माझ्या कारकीर्दीचा आलेख उंचावण्यात रंगभूमीचाही वाटा मोठा आहे, असं मला वाटतं. आता या क्षेत्रात मी बऱ्यापैकी यश कमावल्यामुळे माझ्या कुटुंबियांना माझा अभिमान वाटतो,” असे सृष्टीने सांगितले. येत्या काही वर्षांमध्ये सृष्टी जैन या अभिनेत्रीकडून खूप अपेक्षा बाळगता येतील, अशी चिन्हे दिसत आहेत. आता राणी म्हणून तिची भूमिका प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही पसंत पडते का, ते पाहावे लागेल.

Web Title: Srishti Jain said drama is a big part of my success