Spruha Joshi : स्पृहाचे युट्यूब चॅनल आधी हॅक आणि नंतर झाले डिलीट, तिचे सगळे व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 16:13 IST2023-01-18T16:13:00+5:302023-01-18T16:13:16+5:30

स्पृहा जोशी मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री. अभिनयासोबतच ती उत्तम कवयित्री देखील आहे. याशिवाय ती आता एक युट्यूबरही आहे.

Spruha Joshi YouTube channel was hacked said all the videos got back because of teams effort | Spruha Joshi : स्पृहाचे युट्यूब चॅनल आधी हॅक आणि नंतर झाले डिलीट, तिचे सगळे व्हिडिओ...

Spruha Joshi : स्पृहाचे युट्यूब चॅनल आधी हॅक आणि नंतर झाले डिलीट, तिचे सगळे व्हिडिओ...

Spruha Joshi : स्पृहा जोशी मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री. अभिनयासोबतच ती उत्तम कवयित्री देखील आहे. तिच्या कविता वाचनाचे तर अनेक जण चाहते आहेत. स्पृहा स्वत: लिहिलेल्या आणि इतरांच्या तिला आवडलेल्या कविता ती वाचते, कार्यक्रम करते. तसंच स्पृहाचं एक युट्यूब चॅनलही आहे. स्पृहा जोशी या नावानेच हे चॅनल असून त्यात स्पृहा कविता वाचन, फूड ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग करत असते. मात्र काही दिवसांपासून चाहत्यांना तिचे हे चॅनलच दिसले नाही आणि स्पृहानेही कोणतेच व्हिडिओ पोस्ट केले नाहीत. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता. आता स्पृहानेच यावर खुलासा केला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत स्पृहा म्हणाली, 'मला अनेक जणांचे फोन, मेसेज, मेल आले की आपले चॅनल युट्यूबवर दिसत का नाहीए. तर आपले युट्यूब चॅनल हॅक झाले होते. संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांनंतर आपल्याला चॅनल जशाच्या तसे परत मिळाले आहे. ते डिलीट करण्यात आले आहे. सर्व व्हिडिओ आहेत तसेच पुन्हा मिळाले आहेत. तर तुमच्यासाठी  नवीन व्हिडिओही येत आहे.'


 
स्पृहा तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत तिने लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तसेच तिचे युट्यूब चॅनल आणि कवितांचे कार्यक्रम सुरुच असणार आहेत. 

Web Title: Spruha Joshi YouTube channel was hacked said all the videos got back because of teams effort