रसिकाबरोबर होणाऱ्या तुलनेवर स्पृहाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मला जे प्रेम मिळालं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:04 AM2023-10-13T11:04:46+5:302023-10-13T11:05:32+5:30

'सूर नवा ध्यास नवा'बद्दल पहिल्यांदाच बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, "रसिकाने मला मेसेज करून..."

Spruha joshi talk about rasika sunil sur nava dhyas nava said audience will love her | रसिकाबरोबर होणाऱ्या तुलनेवर स्पृहाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मला जे प्रेम मिळालं..."

रसिकाबरोबर होणाऱ्या तुलनेवर स्पृहाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "मला जे प्रेम मिळालं..."

छोट्या पडद्यावरील 'सूर नवा ध्यास नवा' या रिएलिटी शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वाप्रमाणेच या शोला नवा अँकरही मिळाला आहे. मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. याआधी स्पृहा जोशी या शोचं सूत्रसंचालन करत होती. या शोमुळे स्पृहाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. त्यामुळेच रसिका सुनील आणि स्पृहामध्ये तुलना होत होती. आता पहिल्यांदाच स्पृहाने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना यावर भाष्य केलं. 

स्पृहाने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप काही देऊन जातो. जेव्हा मला कामाची आणि नवीन ओळखीची गरज होती त्यावेळेस सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम माझ्याकडे आला. या कार्यक्रमाने मला वैयक्तिक आयुष्यातही खूप काही दिलं आहे. चांगली माणसं, सांगतिक अनुभव या सगळ्या गोष्टी मला सूर नवा ध्यास नवा मुळे मिळाल्या. या कार्यक्रमामुळे उत्तम क्षण माझ्या वाट्याला आले. रसिकाची मुलाखत मी पाहिली. त्यात तिने याबद्दल खूप सुंदरप्रकारे भाष्य केलं."

"कुठलाही बदल हा अवघडच असतो. पण, ती गरजही असते. त्यामागेही अनेक गोष्टी असतात. टेलिव्हिजनचं माध्यम पटकन तुमचा स्वीकार करतं, असं मला वाटतं. आपला प्रेक्षकवर्ग फार मोकळ्या हाताने प्रेम देतं. त्यामुळे मला जसं प्रेम मिळालं. तसंच रसिकालाही मिळेल, याची मला खात्री आहे," असंही तिने सांगितलं.  

रसिकाबद्दल स्पृहा म्हणाली, "रसिकाने मला खूप सुंदर मेसेज केला आहे. खरं तर हा कामाचा भाग आहे. त्यामुळे याची काहीच गरज नव्हती. पण, तिला असं वाटलं की हे शेअर करावं. हा कार्यक्रम मी करतेय. त्यामुळे तू बघ आणि तुला काही खटकलं तर मला नक्की सांग, असा तिने मेसेज केला आहे. मला वाटतं, हे सांगण्याचा आपल्या कलाकारांकडे मोठेपणा आहे. ही खूप सुंदर गोष्ट आहे. मला वाटतं आपण फार भाग्यवान आहोत, की अशा लोकांमध्ये आपण  काम करतो."

Web Title: Spruha joshi talk about rasika sunil sur nava dhyas nava said audience will love her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.