‘दिव्य दृष्टी’त प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील हा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 19:00 IST2019-03-31T19:00:00+5:302019-03-31T19:00:02+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत आध्विक महाजन, सना सय्यद आणि नीरा बॅनर्जी मुख्य भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

The spectacle of 'Chennai Express' will be seen in the audience | ‘दिव्य दृष्टी’त प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील हा प्रसंग

‘दिव्य दृष्टी’त प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील हा प्रसंग

ठळक मुद्दे‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटात शाहरूख खान-दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रीत झालेले एक दृश्य या दोघांवर नुकतेच चित्रीत करण्यात आले. मालिकेत रक्षितची भूमिका साकारणारा आध्विक महाजन हा स्वत: शाहरूख खानचा फार मोठा चाहता आहे.

दिग्गज कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने
प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. भविष्यातील घटना पाहण्याची आणि त्यात बदल घडविण्याची विशेष शक्ती लाभलेल्या दिव्या आणि दृष्टी या दोन बहिणी लहानपणीच एकमेकींपासून दुरावलेल्या आहेत. त्यांचीच कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. 

‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत आध्विक महाजन, सना सय्यद आणि नीरा बॅनर्जी मुख्य भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेचे कथानक इतर मालिकांपेक्षा खूप वेगळे असल्याने या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील आध्विक आणि सना यांचे कपल तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या दोघांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटात शाहरूख खान-दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रीत झालेले एक दृश्य या दोघांवर नुकतेच चित्रीत करण्यात आले. मालिकेत रक्षितची भूमिका साकारणारा आध्विक महाजन हा स्वत: शाहरूख खानचा फार मोठा चाहता आहे. त्यामुळे हे दृश्य पडद्यावर साकारणे त्याच्यासाठी खूप खास होते. यासंदर्भात आध्विक सांगतो, “मला जेव्हा कळलं की, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटात शाहरूख खान-दीपिका पादुकोणला उचलून मंदिराच्या पायऱ्या चढतो हा प्रसंग आमच्यावर चित्रीत केला जाणार आहे, तेव्हा माझा आनंद गगनात मावेना. या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी कडक ऊन पडलं होतं आणि आम्ही अनवाणी चालत होतो. तरीही हा प्रसंग अचूक साकारला जावा, यासाठी आम्ही बरेच टेक दिले.”

या मालिकेच्या निर्मात्या मुक्ता धोंड यांनी या प्रसंगाची झलक आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्याने या मालिकेच्या चाहत्यांमध्ये या प्रसंगाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: The spectacle of 'Chennai Express' will be seen in the audience