दुसऱ्यांदा लग्न करतेय ही अभिनेत्री, पहिल्या नवऱ्यानं केलं होतं सुसाइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:23 IST2019-07-26T13:22:38+5:302019-07-26T13:23:16+5:30

छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकणार आहे.

South Actress Pawani Reddy preparing for marrying second, Pradeep had suicide | दुसऱ्यांदा लग्न करतेय ही अभिनेत्री, पहिल्या नवऱ्यानं केलं होतं सुसाइड

दुसऱ्यांदा लग्न करतेय ही अभिनेत्री, पहिल्या नवऱ्यानं केलं होतं सुसाइड

छोट्या पडद्यावरील पवनी रेड्डी पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकणार आहे. तिने नुकतीच ही घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पवनीचं दुसरं लग्न तिचा फॅमिली फ्रेंड आनंदसोबत होत आहे. तिच्या पहिला पती प्रदीप कुमारने आत्महत्या केली होती. 

 लग्न दाक्षिणात्य अभिनेता प्रदीप कुमारसोबत २०१३ साली झालं होतं. प्रदीप साऊथ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रचलित नाव होते. तो सप्त मात्रिका आणि सुमंगली या मालिकेतून चर्चेत आले होते. सांगितलं जातं की, पवनीचा नवरा प्रदीपने त्याच्या पत्नीसोबत झालेल्या गैरसमजामुळे आत्महत्येसारखा पर्याय अवलंबला होता. हे प्रकरण इतकं मोठं नव्हतं. दोघांचं नातं खूप चांगलं सुरू होतं. पण अचानक प्रदीपने हे वाईट पाऊल उचललं. 


नवऱ्याच्या निधनानंतर पवनी एकदम सदम्यात गेली होती. या घटनेसाठी स्वतःला ती जबाबदार ठरवत असते. बराच काळ ती लोकांपासून दुरावली होती. मात्र आता तिने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केलं.


सूत्रांच्या माहितीनुसार, पवनीच्या जीवनात येणारा दुसरा व्यक्ती घरातील असून या घटनेतून तिला बाहेर काढण्यासाठी खूप सहायक ठरला. पवनीने पहिल्या नवऱ्याचा टॅटू देखील काढला आहे. तो पवनीला खूप सपोर्ट करतो. तो पवनीचा फॅमिल फ्रेंडदेखील आहे.


असंही सांगितलं जातंय की या घटनेतून पवनी बाहेर आली असून आता तिने तिचं संपूर्ण लक्ष अभिनयाकडे केंद्रित केलं आहे.

तमीळ व तेलुगू मालिकेतून लोकप्रिय झालेली पवनी रेड्डी सध्या तमीळ मालिका चिन्नथंबीमध्ये काम करत आहे.

Web Title: South Actress Pawani Reddy preparing for marrying second, Pradeep had suicide