गॉसीप आणि बरंच काही : आता उलगडणार कलाकारांचे पडद्यामागील धमाल किस्से
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 19:30 IST2022-08-19T19:30:00+5:302022-08-19T19:30:00+5:30
Gossip ani barach kahi: पडद्यामागील हे रंजक किस्से उलगडण्यासाठी 'गॉसीप आणि बरंच काही' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गॉसीप आणि बरंच काही : आता उलगडणार कलाकारांचे पडद्यामागील धमाल किस्से
सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळत आहे. यात खासकरुन रिअॅलिटी शोला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहेत. यामध्येच आता सोनी मराठीवर लवकरच एक नवा कार्यक्रम सुरु होणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांचे पडद्यामागील धमाल किस्से उलगडले जाणार आहेत.
पडद्यावर वावरणारे कलाकार दररोज प्रेक्षक पाहात असतात. मात्र, पडद्यामागे हे कलाकार कसे वागतात, त्यांच्या अभिनयाचा सराव कसा होतो, एखाद्या मालिका वा चित्रपटाचं चित्रीकरण कसं होतं असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात. त्यामुळेच पडद्यामागील हे रंजक किस्से उलगडण्यासाठी 'गॉसीप आणि बरंच काही' (gossip ani barach kahi) हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या कार्यक्रमामध्ये मालिकांच्या सेटवर जाऊन त्या मालिकेतल्या कलाकारांपैकी एक सूत्रसंचालक घेऊन संपूर्ण पडद्यामागची मजामस्ती त्या सूत्रसंचालकाबरोबरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी सोनी मराठी वाहिनीवरच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातलं पडद्यामागचं ‘गॉसीप आणि बरंच काही’ पाहणं रंजक ठरणार आहे.