सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 07:00 IST2020-11-08T07:00:00+5:302020-11-08T07:00:03+5:30

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Sonalee Kulkarni shares glamorous photoshoot with fans | सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष

सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.सोनाली कुलकर्णी सध्या डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या फॅन्ससोबत नेमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

नुकताच सोनालीने तिचे इंडो वेस्टर्न लूकमधले फोटो शेअर केले आहेत. यात सोनाली हटके लूकमध्ये दिसतेय.  सोशल मीडियावर  फोटोंना पसंती मिळत असून दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला.. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो असे समजते आहे.

Web Title: Sonalee Kulkarni shares glamorous photoshoot with fans