"तुझं शिक्षण किती?" विचारणाऱ्या चाहत्याला बांदेकरांच्या मुलाने दिलं चोख उत्तर, म्हणाला- एवढा नक्कीच शिकलो आहे की...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:13 PM2024-03-06T12:13:10+5:302024-03-06T12:14:50+5:30

सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं.

soham bandekar reply to fan who asked him about his educational qualification | "तुझं शिक्षण किती?" विचारणाऱ्या चाहत्याला बांदेकरांच्या मुलाने दिलं चोख उत्तर, म्हणाला- एवढा नक्कीच शिकलो आहे की...

"तुझं शिक्षण किती?" विचारणाऱ्या चाहत्याला बांदेकरांच्या मुलाने दिलं चोख उत्तर, म्हणाला- एवढा नक्कीच शिकलो आहे की...

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आदेश-सुचित्रा यांचा लेक सोहम बांदेकरनेही अभिनयाची वाट धरली. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्य' या मालिकेतून त्याने कलाविश्वात पाऊल ठेवलं. या मालिकेत तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसला होता. सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स तो चाहत्यांना सोशल मीडिया पोस्टमधून देत असतो. त्याबरोबरच तो अनेकदा फोटोही शेअर करताना दिसतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली. या सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला "तुझं शिक्षण किती?" असा प्रश्न विचारला. यावर सोहमने अगदी चोखपणे उत्तर दिलं. "एवढा तरी नक्कीच शिकलेलो आहे की चूक आणि बरोबर हे कळेल. मला वाटतं हे पुरेसं आहे", असं उत्तर सोहमने दिलं. 

या सेशनमध्ये आणखी एका चाहत्याने सोहमला "योग्य लाइफ पार्टनर कसा निवडावा? काही सल्ला...मी खूप कन्फ्युज आहे," असं विचारलं. चाहत्याच्या या प्रश्नाला सोहमने मिश्किलपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, "हाहाहा! मलाच हे कळत नाही. मलाच कोणीतरी शिकवा प्लीज...नाहीतर अरेंजमॅरेज". 

दरम्यान, सोहम बांदेकरने 'नवे लक्ष्य' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमातही सोहम झळकला होता. 

Web Title: soham bandekar reply to fan who asked him about his educational qualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.