म्हणून ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी करणार नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 14:20 IST2017-03-18T08:50:29+5:302017-03-18T14:20:29+5:30

या मालिकेत सध्या नायरा (शिवांगी जोशी) आणि कार्तिक (मोहसिन खान) यांच्या विवाहाचे कथानक सुरू असून या भागाचे शूटिंग अलीकडेच ...

So, this is what the relationship is called 'Fame Shivangi Joshi will not marry' | म्हणून ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी करणार नाही लग्न

म्हणून ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी करणार नाही लग्न

मालिकेत सध्या नायरा (शिवांगी जोशी) आणि कार्तिक (मोहसिन खान) यांच्या विवाहाचे कथानक सुरू असून या भागाचे शूटिंग अलीकडेच राजस्थानमधील बिकानेर येथे पार पडले. या विवाहप्रसंगाला छोट्य़ा पडद्यावरील सर्वात भव्य विवाहसोहळा ठरवण्यासाठी निर्मात्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. मालिकेत नायराची भूमिका साकारणारी शिवांगी जोशी आपल्या पडद्यावरील का होईना,परंतु इतक्या भव्य विवाह सोहळ्याच्या चित्रीकरणामुळे भारावून गेली होती.असे असले तरी तिला जेव्हा तिच्या वास्तव जीवनातील विवाहाबद्दल विचारणा करण्यात आली,तेव्हा तिने सांगितले, “आतापर्यंत मालिकांमध्ये मी वधूची भूमिका बरेचदा साकारली असली, तरी मला नायराच्या विवाह सोहळयाचा प्रसंग सर्वाधिक भावला आहे.जणू काही वास्तवातील विवाहच सुरू असल्याचा भास मला होत होता.इतकंच नाही, तर लालगड किल्ल्यात आम्ही या विवाह सोहळ्याचे शूटिंग करत होतो, तेव्हा तिथे जमलेल्या पर्यटकांनाही तिथे खरं लग्न होत असल्याचं वाटत होतं. यावरून माझ्या पडद्यावरील विवाहाला निर्मात्यांनी किती राजेशीही आणि महत्त्व दिलं होतं, त्याची कल्पना करता येईल. हा वधूचा पोशाख मी गेले 20 दिवस वापरत असून प्रत्यक्ष वधू होण्याचा मला आलेला हा अनुभव सध्या तरी पुरेसा आहे. माझ्या वास्तव जीवनातील लग्नाला अजून बराच अवकाश आहे. मालिकेतील बिदाईच्या प्रसंगात मी इतकी रडले आहे की आता माझ्या ख-या लग्नातील बिदाईला मला रडू तरी येईल की नाही, याची शंकाच आहे.”

विशेष म्हणजे आईसाठी मुलीचे लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण असतो.मालिकेतील होणारे लग्न हा एक ड्रामा आहे. खरोखरीचे लग्न होणार नाही हे माहित असूनही ऑनस्क्रीन रंगणा-या शिवांगीच्या लग्नाच्या शूटिंगवेळी शिवांगीच्या आईनेच लग्नाच्या तयारीसाठी खरोखर मदत केली होती.सतत शिवांगीची आई  सेटवर तिच्या सोबत असायची आणि अनेकवेळा मालिकेच्या टीमला शूटिंगच्या तयारीसाठी मदतही करायची. हळदी समारंभाच्या शूटिंगवेळी शिवांगीला लावण्यात आलेली हळदही तिच्या आईने स्वतः तयार केली होती. 

Web Title: So, this is what the relationship is called 'Fame Shivangi Joshi will not marry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.