लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:19 IST2019-08-08T13:18:26+5:302019-08-08T13:19:52+5:30

न भूतो न भविष्यति असा हा लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळा देव देवतांच्या साक्षीने पार पडणार आहे.

So it will be Lakshmi - Narayan's Wedding Ceremony ! | लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…

लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…

लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये नुकताच लक्ष्मी नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा पार पडला. देव देवतांच्या साक्षीने विवाह सोहळ्याच्या सर्व विधी पार पडल्या गेल्या. या सोहळ्यामध्ये अलक्ष्मीने कोणत्याही प्रकारचा विघ्न आणू नये म्हणून तिला एका खोलीमध्ये ठेवण्यात आले होते कारण तीचा या विवाहाला पहिल्यापासूनच विरोध होता. परंतु आता लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला असून, वैकुंठामध्ये लक्ष्मीचा मोठ्या थाटामाटात गृहप्रवेश होणार आहे. याचवेळी पृथ्वीलोकावर नारायणांच्या भक्ताला त्यांच्या दर्शनाची आस लागली आहे, आणि त्यामुळेच ही भक्त विष्णु सहस्त्रनामावलीचा जाप करण्यात मग्न आहे आणि ही भक्त म्हणजे वेदवती. वेदवती नारायणाच्या भेटीसाठी आतुर आहे. भक्ताच्या हाकेला विष्णु ऐकून दर्शन देण्यासाठी पृथ्वीलोकावर येतात. लक्ष्मी आणि नारायण यांचा संसार आता कुठे सुरू होत आहे.  न भूतो न भविष्यति असा हा लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळा देव देवतांच्या साक्षीने पार पडणार आहे. 


लक्ष्मी नारायण यांचा विवाह विधीयुक्त पार पडणार असून यामध्ये सीमांत पूजन, गौरीहर या विधीसाठी साक्षात महादेव आणि पार्वती विष्णुलोकामध्ये अवतरणार आहेत, तर मंगलाष्टकांसाठी फुलांचा आंतरपाट, फुल- दिव्यांच्या रोषणाईमध्ये सजलेला दरबार आणि मंडप असा दिव्य सोहळा पार पडणार आहे ... परंतू, या लग्नात अनेक विघ्ने येणार आहेत.. लक्ष्मी आणि नारायण यांच्या विवाहाच्या अलक्ष्मी मात्र विरोधात आहे. विष्णुशी विवाह करण्याची अलक्ष्मीची असलेली इच्छा तिने व्यक्त देखील करून दाखविली होती.
 

Web Title: So it will be Lakshmi - Narayan's Wedding Ceremony !