म्हणून आलिया भट्ट काम करण्यास तयार झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 08:22 AM2018-05-30T08:22:03+5:302018-05-30T13:52:03+5:30

डायनॅमिक युथ आयकॉन्सपैकी एक असलेली आलिया भट्ट ही स्टार प्लस चॅनलच्या ब्रँड अम्बेसेडरच्या रूपात झळकणार आहे. आलिया स्टारप्लसच्या नव्या ...

So Alia Bhatt got ready to work | म्हणून आलिया भट्ट काम करण्यास तयार झाली

म्हणून आलिया भट्ट काम करण्यास तयार झाली

googlenewsNext
यनॅमिक युथ आयकॉन्सपैकी एक असलेली आलिया भट्ट ही स्टार प्लस चॅनलच्या ब्रँड अम्बेसेडरच्या रूपात झळकणार आहे. आलिया स्टारप्लसच्या नव्या गाण्यामध्ये दिसणार आहे. या गाण्याच्या माध्यामातून तिला अनेक कार्यक्रम आणि व्यक्तिरेखांसह विभिन्न भावनांचा अनुभव येतो. ती प्रेक्षकांनाही आपल्यासोबत घेऊन जाईल आणि अनुभवेल या नयी नयी कहानियां जिस में है कुछ नयी बात.

आलिया भट्ट म्हणाली, “ हा ब्रँड आणि माझ्यामध्ये असणाऱ्या साम्यामुळे मी स्टार प्लससोबत काम करण्यास तयार झाले. स्टार वाहिनी आणि मी दोघेही आमचे कुटुंबीय, मित्र आणि नातेसंबंधांना खूप महत्त्व देतो आणि त्यांचे महत्त्व जाणतो.” ती पुढे असेही म्हणाली, “अतिशय खऱ्या आणि आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखांसह स्टारप्लसवर जे अनेक नवीन कार्यक्रम सुरू होत आहेत त्याबद्दल मी अतिशय उत्साहित आहे. मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह, कुल्फी कुमार बाजेवाला आणि कृष्णा चली लडंन सारख्या मालिका नातेसंबंध आणि भावनांना अधोरेखित करतात, तर सबसे स्मार्ट कौन सारखी अनोखी संकल्पना सामान्य लोकांच्या हुशारीला दाद देईल. या शोज्‌सोबत स्टारप्लस आपल्या आयुष्याला गेल्या दोन दशकांप्रमाणेच स्पर्श करत राहिल याची मला खात्री आहे.”

काहि दिवसांपूर्वी रिलीज झालेला आलियाचा राजी हा चित्रपट 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला आहे.‘राजी’ने एका पाठोपाठ एक असे अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. चित्रपट आलियाने सहमत नामाच्या कश्मिरी मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. पाकिस्तानात राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळताहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं. मेघनाचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित आहे आलियाच्या नवऱ्याची भूमिका विक्की कौशलने साकारली आहे. 

ALSO READ :  ‘राजी’ ठरला आलिया भट्टच्या करिअरमधील दुसरा सर्वाम मोठा हिट

Web Title: So Alia Bhatt got ready to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.