'गीता महोत्सव तुलसी की संग'मध्ये दिसणार स्मृती ईराणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:12 IST2025-12-03T17:11:40+5:302025-12-03T17:12:56+5:30
Geeta Mahotsav Tulsi Ki Sang : स्टार प्लसने नुकतीच 'गीता महोत्सव तुलसी की संग' या तीन भागांच्या सांस्कृतिक कंटेंट इव्हेंटची घोषणा केली आहे.

'गीता महोत्सव तुलसी की संग'मध्ये दिसणार स्मृती ईराणी
स्टार प्लसने नुकतीच 'गीता महोत्सव तुलसी की संग' या तीन भागांच्या सांस्कृतिक कंटेंट इव्हेंटची घोषणा केली आहे. १ ते ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हे विशेष भाग स्टार प्लसवर प्रसारित होणार आहेत. गीता जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून भगवद्गीतेचे कालातीत उपदेश आजच्या पिढीसाठी नव्याने अधोरेखित होणार आहेत. स्मृती ईराणी यांनी साकारलेल्या ‘तुलसी’च्या सहभागामुळे या कार्यक्रमाला चारचाँद लागतील. हा केवळ एक कार्यक्रम नसून विशेष म्हणजे हा कार्यक्रम भारताच्या वाढत्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
स्मृती ईराणी यांनी साकारलेली तुलसी ही व्यक्तिरेखा म्हणजे भारतातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलेलं सर्वाधिक विश्वासार्ह नाव असून त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. स्मृती यांच्या तुलसी या भूमिकेने पिढ्यान्पिढ्याचा विश्वास निर्माण करून प्रेक्षकांसोबत एक भावनिक नात निर्माण केलं आहे. तुलसीची व्यापक लोकप्रियता ही जगभरात पाहायला मिळते आणि म्हणून क्योंकि सास भी कभी बहू थी सीझन २च्या इंटिग्रेशनदरम्यान बिल गेट्स यांनी त्यांना "जय श्री कृष्ण” म्हणत अभिवादन केलं होतं.
याविषयी बोलताना स्मृती ईराणी म्हणाल्या की, "गीता महोत्सवासाठी पुन्हा एकदा 'तुलसी' बनणे ही माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारी गोष्ट आहे. भारताची सांस्कृतिक आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी वेगाने वाढत असून विशेषतः तरुण प्रेक्षक अर्थपूर्णता, आत्मपरीक्षण आणि भावनिक स्पष्टता देणाऱ्या कथांच्या शोधात आहेत. भगवद्गीता ही आपल्या सर्वात मोठ्या ज्ञानसंपदांपैकी एक आहे आणि तिचे उपदेश नव्या पिढीसाठी सादर करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. यातील भागांमधून प्रेक्षकांना तीच शक्ती आणि उद्देश्य मिळेल, अशी आशा आहे." परंपरेशी मजबूत नाळ जोडत आधुनिक दृष्टिकोनातून सादर केलेला गीता महोत्सव तुलसी के संग हा कार्यक्रम नक्कीच चर्चेचा विषय ठरतोय.