स्मृती इराणींना कपिल शर्मा शोच्या गार्डनं ओळखलंच नाही? रागारागात शूटींग न करताच परतल्या केंद्रीय मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:00 IST2021-11-24T14:36:08+5:302021-11-24T15:00:25+5:30
The Kapil Sharma Show : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani )आपल्या एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी होणार होत्या. पण यादरम्यान असं काही घडलं की, याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी...

स्मृती इराणींना कपिल शर्मा शोच्या गार्डनं ओळखलंच नाही? रागारागात शूटींग न करताच परतल्या केंद्रीय मंत्री
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani )आपल्या एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) सहभागी होणार होत्या. पण यादरम्यान असं काही घडलं की, कुणीच याची कल्पनाही केली नसावी. होय, स्मृती नियोजित वेळी कपिल शर्मा शोच्या सेटवर पोहोचल्या. पण सेटवरच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओळखलंच नाही. त्याने स्मृतींना आत जाण्यास मज्जाव केला. विशेष म्हणजे, या सुरक्षा गार्डने एका झोमॅटो बॉयला काहीही न विचारता आत जाऊ दिलं, पण स्मृतींना अडवून ठेवलं. साहजिकच स्मृती इराणी संतापल्या आणि शूटींग न करताच सेटवरून माघारी परतल्या.
कपिल शर्मा व त्याच्या प्रॉडक्शन टीमला हा वृत्तांत कळला तसा सेटवर खळबळ माजली. अर्थात अद्याप यासंदर्भात कपिल शर्मा वा स्मृती इराणी यांच्या वतीने कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
‘दैनिक भास्कर’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, आज 24 नोव्हेंबरला स्मृती इराणींच्या एपिसोडचं शूटींग होणार होतं. स्मृती त्यांचा ड्रायव्हर व अन्य दोन जणांच्या टीमसोबत या शूटींगसाठी पोहोचल्या. पण सेटच्या प्रवेशद्वारावरच्या सुरक्षा रक्षकाने स्मृतींना ओळखलं नाही आणि त्यांना आत जाण्यास मनाई केली. मी शूटींगसाठी आले आहे, मी शोची स्पेशल गेस्ट आहे, असं त्याला सांगूनही आम्हाला तसा काहीही आदेश नाही, तुम्ही आत जाऊ शकत नाही, असं सुरक्षा रक्षकानं स्पष्टपणे सांगितलं. अखेर स्मृती इराणी संतापून सेटवरून निघून गेल्या. हा प्रकार कळल्यानंतर सेटवर गोंधळ उडाला. कपिल शर्मा व प्रॉडक्शन टीमने स्मृतींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण स्मृती परतल्यानाहीत.
ताज्या वृत्तानुसार, आता त्याचा एपिसोड काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे.