स्मिता गोंदकर दिसणार 'काय घडलं त्या रात्री?' मालिकेत, शेअर केला प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 18:35 IST2020-12-22T18:34:53+5:302020-12-22T18:35:19+5:30

स्मिता गोंदकर बिग बॉस मराठीनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे.

Smita Gondkar will appear 'What happened that night?' In the series, shared promo | स्मिता गोंदकर दिसणार 'काय घडलं त्या रात्री?' मालिकेत, शेअर केला प्रोमो

स्मिता गोंदकर दिसणार 'काय घडलं त्या रात्री?' मालिकेत, शेअर केला प्रोमो

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. लवकरच स्मिता गोंदकर छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. ती झी मराठीवरील नवीन मालिका 'काय घडलं त्या रात्री?'मध्ये दिसणार आहे.


अभिनेत्री स्मिता गोंदकर 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच तिचा या मालिकेतील तिच्या लूकचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात स्मिताने साडी नेसली असून तिच्या हातात चाकू पहायला मिळतो आहे. हा फोटो शेअर करत या सुंदर चेहऱ्यामागे दडलंय काय ? संजना येतेय तुम्हाला भेटायला. असे लिहिण्यात आले आहे.


'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत अभिनेत्री मानसी साळवी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्ये मागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक केली जाते. ही हूशार व चलाख पोलिस ऑफीसर तिच्या पद्धतीने प्रत्येकासमोर निडरपणे उभी राहते, पत्रकारीता असो वा राजकारण कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते. ही मालिका ३१ डिसेंबरपासून गुरू ते शनि रात्री.९:३० वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


स्मिता गोंदकर बिग बॉस मराठीनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. 

Web Title: Smita Gondkar will appear 'What happened that night?' In the series, shared promo