​भाभीजी घर पर है या मालिकेतला विभूती म्हणजेच आशिफ शेख बनला तवायफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 18:06 IST2017-01-05T18:06:49+5:302017-01-05T18:06:49+5:30

भाभीजी घर पर है या मालिकेत आशिफ शेख प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतो. कथानकांच्या मागणीनुसार तो वेगवेगळी रूपे ...

Sister-in-law is at home or in the series, Vibhuti means that Ashif Sheikh becomes a tiger | ​भाभीजी घर पर है या मालिकेतला विभूती म्हणजेच आशिफ शेख बनला तवायफ

​भाभीजी घर पर है या मालिकेतला विभूती म्हणजेच आशिफ शेख बनला तवायफ

भीजी घर पर है या मालिकेत आशिफ शेख प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतो. कथानकांच्या मागणीनुसार तो वेगवेगळी रूपे धारण करत असतो. कधी तो रेडिओ जॉकी बनतो तर कधी लाँड्रीमॅन तर कधी पगडी घातलेला पंजाबी. आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. तो आता मालिकेत स्त्रीच्या वेशात दिसणार आहे आणि  तेही तो आता तवायफ बनणार आहे. 
विभूतीचे अनितासोबत जोरदार भांडण होणार आहे आणि विभूती काही कामाचा नाही असे अनिता त्याला सुनावणार आहे आणि त्याला घऱाच्या बाहेरदेखील काढणार आहे. त्यामुळे कमी वेळात खूप सारा पैसा कमवण्याची शक्कल विभूती लढवणार आहे आणि त्यासाठी तो एका तवायफकडे जाणार आहे आणि तिथे जाऊन तोदेखील तवायफ बनणार आहे. 
आशिफला ज्यावेळी या नव्या भूमिकेविषयी सांगण्यात आले, त्यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न लावता या भूमिकेसाठी होकार दिला. त्याने तवायफ बनून काटा लगा या गाण्यावर नृत्यदेखील सादर केले. त्याचे हे नृत्य पाहून सेटवरील सगळेच अचंबित झाले होते. याविषयी आशिफ सांगतो, "एक अभिनेता म्हणून नेहमीच मी वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्यास तयार असतो. मी ही भूमिका साकारावी अशी या मालिकेच्या निर्मात्यांची इच्छा होती आणि मलादेखील हे खूप इंटरेस्टिंग वाटले. माझे हे नवे रूप माझ्या फॅन्सना खूप आवडेल आणि मला या रूपात पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल याची मला खात्री आहे."

Web Title: Sister-in-law is at home or in the series, Vibhuti means that Ashif Sheikh becomes a tiger