"एक गोष्ट नक्की आहे की...", बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:18 IST2024-09-23T15:18:01+5:302024-09-23T15:18:34+5:30

उत्कर्ष शिंदेने बिग बॉस मराठीविषयी लिहिलेली एक खास पोस्ट चर्चेत आहे (utkarsh shinde, bigg boss marathi 5)

singer utkarsh shind post about bigg boss marathi 5 and riteish deshmukh | "एक गोष्ट नक्की आहे की...", बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

"एक गोष्ट नक्की आहे की...", बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच क्रेझ आहे. रितेश देशमुख या सीझनचंं होस्टिंग करतोय. बिग बॉस मराठीच्या या सीझनचं भाऊचा धक्का हे गाणं बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने लिहिलंय. उत्कर्षला नुकत्याच एका कार्यक्रमात त्याचे फॅन्स भेटले. या फॅन्सना भेटून उत्कर्षने पोस्ट लिहिली की, "बच्चे -जवान- बुढे -बिगबॉस के फॅन्स…….माझ्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या BIGGBOSS ह्या खेळाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

उत्कर्ष पुढे लिहितो, "BIGGBOSS चे खूप मोठे फॉलोअर्स जगभरात आहेत आणि त्याचा भाग होऊन mastermind,Allrounder,Task Master ,complete entertainer अश्या नावाने जगभर कौतुक मिळणे हा एक अविश्वसनीय अनुभव आहे माझ्यासाठी. भाऊचा धक्काची क्रेझ .माझ्या गायकीची, गाण्याची, लिखाणाची संगीताची प्रेक्षकांकडून मिळलेले आशीर्वाद. त्याची पोचपावती जिकडे जातो तिकडे अनुभवायला मिळतीये. माझ्यातली कला दाखवायला उत्तम मंच मिळाला आणि BIGGBOSS ने खरोखरच माझ्यासाठी बरेच दरवाजे उघडले."


उत्कर्ष शेवटी लिहितो, "मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत लिड अभिनेता होण्याचं, तर काही दिग्गजांसोबत गायक सूत्रसंचालनानंतर कधी डान्स, तर कधी रायटर होण्याची संधी मिळणं, त्यांच्या सानिध्यात शिकता येत आहे, हेच खूप आहे. आणि जिकडे जावं तिकडे भरभरून फॅन्स चाहते. त्यांचे अमूल्य प्रेम मिळतं हे माझ्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे.एक गोष्ट नक्की आहे.. चर्चा पण आपलीच, हवा पण आपलीच. प्रेम पण आपलच आणि आशीर्वाद ही आपलेच. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने उत्कर्षचा उत्कर्ष होत होत आता जास्त होतोय अजून खूप होत राहील .लव्ह यू प्रेक्षक माय बाप लव्ह यू biggboss"

Web Title: singer utkarsh shind post about bigg boss marathi 5 and riteish deshmukh