राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 09:00 IST2023-09-21T09:00:27+5:302023-09-21T09:00:59+5:30

अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिशा आई झाली.

Singer Rahul Vaidya and actress Disha Parmar's baby arrives at home | राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन

राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन

छोट्या पडद्यावरील मालिका 'बडे अच्छे लगते हैं'ची अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिशा आई झाली. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या बातमीने चाहते खूप आनंदित झाले आहेत आणि त्याच्या पोस्टवर त्यांचे अभिनंदन करत आहेत.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, 'आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि मुलगी दोघीही निरोगी आहेत आणि पूर्णपणे बऱ्या आहेत. आम्ही आनंदी आहोत. बाळावर तुमचे आशीर्वाद असू दे.

'बिग बॉस १४' मधून पुन्हा मिळाली प्रसिद्धी 
राहुल वैद्य 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता, जिथे त्याच्या आवाजाचे खूप कौतुक झाले होते. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याने सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस १४' मध्ये भाग घेतला, त्यानंतर तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.

राहुल लग्नापूर्वी दिशासोबत  होता रिलेशनशिपमध्ये
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर राहुल आणि मॉडेल-अभिनेत्री दिशा परमार लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. राहुल जेव्हा 'बिग बॉस १४' मध्ये होता तेव्हा त्याने दिशाला प्रपोज केले होते. दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केले आणि १८ मे २०२३ रोजी ते लवकरच पालक होणार असल्याचे जाहीर केले.

Web Title: Singer Rahul Vaidya and actress Disha Parmar's baby arrives at home