Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपुर्वी काही तास आधी काय घडलं?; हिंदुस्तानी भाऊनं सत्य सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:30 PM2021-09-05T15:30:49+5:302021-09-05T15:31:13+5:30

सिद्धार्थ शुक्ला(Sidharth Shukla) याच्या निधनाबद्दल हिंदुस्तानी भाऊने इन्स्टावर पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती.

Sidharth Shukla: What happened a few hours before Siddharth Shukla's death ?; Hindustani bhau Said | Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपुर्वी काही तास आधी काय घडलं?; हिंदुस्तानी भाऊनं सत्य सांगितलं

Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपुर्वी काही तास आधी काय घडलं?; हिंदुस्तानी भाऊनं सत्य सांगितलं

googlenewsNext

नवी दिल्ली – टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अचानक एक्झिटनं त्याचे जवळचे सहकारीच नाही तर चाहतेही चिंतेत आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रात सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्लानं वयाच्या ४० व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या जाण्यानंतर अनेकजण त्याच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करत आहेत. अशातच बिग बॉस १३ मधील स्पर्धक विकास पाठक ज्यांना सगळेच हिंदुस्तानी भाऊ नावानं ओळखतात. तेदेखील सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी घरी पोहचले होते.

या भेटीनंतर हिंदुस्तानी भाऊनं (Hindustani Bhau) माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, मृत्यूच्या काही तास आधी सिद्धार्थ शुक्लासोबत काय घडलं होतं. हे त्याने आई रिताच्या हवाल्याने माध्यमांशी शेअर केले. सिद्धार्थनं १-२ सप्टेंबरच्या रात्री काय केलं होतं? त्यावर हिंदुस्तानी भाऊ म्हणाला की, सर्वकाही ठीक होतं. सिडनं डिनर केलं आणि झोपायला त्याच्या रुममध्ये गेला. रात्री ३.३० वाजता सिद्धार्थनं त्याच्या आईला एक ग्लास पाणी मागितलं त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. आईने त्याच्या पाणी आणलं. त्याने पाणी प्यायल्यानंतर आईस्क्रीमही खाल्लं आणि झोपी गेला. सिद्धार्थ जिमचं वर्कआऊट करण्यासाठी सकाळी १० वाजता उठतो परंतु सकाळी अलार्म वाजल्यानंतरही सिड उठला नाही. तेव्हा आई त्याच्या रुममध्ये उठवायला गेली असता तो झोपेतून उठलाच नाही त्यानंतर सर्व समोर आलं.

बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थसोबत होता हिंदुस्तानी भाऊ

सिद्धार्थ शुक्ला(Sidharth Shukla) याच्या निधनाबद्दल हिंदुस्तानी भाऊने इन्स्टावर पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती. तो म्हणाला की, RIP मित्रा, कायम आठवणीत राहशील. हिंदुस्तानी भाऊ आणि सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस १३ या कार्यक्रमात सहस्पर्धक होते. कार्यक्रमावेळी हिंदुस्तानी भाऊ आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात अनेकदा खटके उडाले होते.

“मित्रा, तू लवकर गेलास...!” मृत्यूपूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबत अखेरचा फोन संवाद

मला माफ कर भावा...

अनेक टीव्ही सेलिब्रिटी सिद्धार्थबद्दल बोलताना भावुक झालेत. ‘बिग बॉस 14’फेम एजाज खान (Eijaz Khan) यानेही सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला. केवळ शोक नाही तर त्याने सिद्धार्थची मोठ्या मनानं माफीही मागितली. यात तो लिहितो, ‘मी टोकन गेश्चरवर विश्वास ठेवत नाही. मला तुझ्याशी बोलायंच होतं, पण आता मी तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही. सर्वप्रथम मी तुझी माफी मागू इच्छितो. मी तुला फोन करण्याचा वा भेटण्याचा प्रयत्न केला नाही. काय कारण होतं माहित नाही. कदाचित मी माझ्या कामात व्यग्र होतो. आपण कुठं ना कुठं भेटूच, असं मला वाटलं होतं. पण आपली भेट झालीच नाही. यासाठी मी स्वत:ला कसं माफ करेल, माहित नाही. मला माफ कर भावा असं एजाजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Web Title: Sidharth Shukla: What happened a few hours before Siddharth Shukla's death ?; Hindustani bhau Said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.