Siddharth Shukla Death: "मित्रा, तू लवकर गेलास...!" मृत्यूपूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबत अखेरचा फोन संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 05:42 PM2021-09-02T17:42:44+5:302021-09-02T17:47:14+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला पोस्टमोर्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली. संध्याकाळी ६ पर्यंत पोस्टमोर्टम पूर्ण होईल

Karan Kundrra Post Last phone conversation with Siddharth Shukla before death | Siddharth Shukla Death: "मित्रा, तू लवकर गेलास...!" मृत्यूपूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबत अखेरचा फोन संवाद

Siddharth Shukla Death: "मित्रा, तू लवकर गेलास...!" मृत्यूपूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबत अखेरचा फोन संवाद

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉस कार्यक्रमाचा होस्ट आणि अभिनेता सलमान खानने सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी पोहोचली आहेसिद्धार्थ शुक्लाच्या आईनं त्याला पाणी पाजलं आणि पुन्हा झोपवलं. परंतु सकाळी सिद्धार्थ उठलाच नाही.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस(Big Boss) फेम सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्यानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थनं काही औषधं घेतली होती. त्यानंतर सकाळी सिद्धार्थ झोपेतून उठलाच नाही.

सिद्धार्थ शुक्लाच्या(Siddharth Shukla) अचानक जाण्यानं अभिनेता करण कुंद्राला धक्का बसला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियलमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी करण कुंद्रासोबत त्याचं अखेरचं बोलणं झालं होतं. करण कुंद्रानं सिद्धार्थ शुक्लासोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियात पोस्ट केले आहे. त्यात म्हटलंय की, शॉकिंग, काल रात्रीच आम्ही दोघं फोनवर बोलत होतो. आमच्या दौघांपैकी इंडस्ट्रीमध्ये कोण चांगलं काम करतंय यावर चर्चा होत होती. विश्वास बसत नाही, मित्रा तू लवकर गेलास. नेहमी हसत राहा. खूप दु:खं होतंय असं त्याने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला पोस्टमोर्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली. संध्याकाळी ६ पर्यंत पोस्टमोर्टम पूर्ण होईल. पोलिसांच्या सूत्रांनुसार, रात्री ३ च्या दरम्यान सिद्धार्थ शुक्लाची तब्येत थोडी बिघडली होती. त्याला वेदना आणि अस्वस्थ वाटत होतं. त्याबाबत त्याने आईला सांगितले. सिद्धार्थ शुक्लाच्या आईनं त्याला पाणी पाजलं आणि पुन्हा झोपवलं. परंतु सकाळी सिद्धार्थ उठलाच नाही. बिग बॉस कार्यक्रमाचा होस्ट आणि अभिनेता सलमान खानने सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तू कायम स्मरणात राहशील असं सलमान म्हटला आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती भावूक

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेदेखील सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली असून सोशल मीडियावर आता तिची चर्चा रंगू लागली आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सिद्धार्थचा एक ब्लॅक एण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने  'Rest In Peace' अशी कॅप्शन दिली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. रियाप्रमाणेच अभिनेता आसिम रियाज, अर्शी खान, राखी सावंत, राहुल महाजन या कालाकारांनीही सिद्धार्थचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे

मुंबई पोलीस सिद्धार्थच्या मृत्यूच्या तपासात गुंतले आहेत

आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले, सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणतीही जखम झालेली नाही. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपासासाठी अभिनेत्याच्या घरी पोलिसांचे एक पथक उपस्थित आहे.

Web Title: Karan Kundrra Post Last phone conversation with Siddharth Shukla before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.