​सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्तीसोबत नच बलियेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 17:20 IST2017-03-10T11:50:16+5:302017-03-10T17:20:16+5:30

सिद्धार्थ जाधवने मराठी इंडस्ट्रीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील त्याचे नाव कमावले आहे. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातील त्याची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली ...

Siddharth Jadhav with wife Trupti in Nach Baliye | ​सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्तीसोबत नच बलियेमध्ये

​सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्तीसोबत नच बलियेमध्ये

द्धार्थ जाधवने मराठी इंडस्ट्रीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील त्याचे नाव कमावले आहे. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातील त्याची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. नुकताच तो कॉमेडी नाइट्स बचाओमध्येदेखील कृष्णा अभिषेक, भारती सिंग या कॉमेडीमधील दिग्गजांसोबत झळकला होता. त्याने अनेक मराठी चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. गोलमाल या चित्रपटातील तर त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. आता सिद्धार्थ नच बलिये या कार्यक्रमात झळकणार आहे. या कार्यक्रमात तो त्याची पत्नी तृप्तीसह नृत्य करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी सध्या ते दोघेही खूप उत्सुक असल्याचे कळतेय. त्या दोघांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी फोटो शूट केले. या कार्यक्रमासाठी त्या दोघांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.
नच बलियेच्या मंचावर आतापर्यंत अनेक मराठी सेलिब्रेटी थिरकले आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रेटींना विजेतेपद पटकावले आहे. नच बलियेच्या पहिल्या पर्वात प्रेक्षकांना सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची जोडी पाहायला मिळाली होती. हे दोघे पहिल्या पर्वाचे विजेते ठरले होते तर नच बलिये 8 मध्ये आता वाजले की बारा फेम अमृता खानविलकर पती हिमांशू मल्होत्रासोबत झळकली होती. ते दोघे त्या सिझनचे विजेते ठरले होते. त्यामुळे आता सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव ही मराठमोळी जोडी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवते का हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
सिद्धार्थप्रमाणेच कॉमेडी नाइट्स बचाओमधील त्याची सहकलाकार भारती सिंगदेखील या कार्यक्रमात तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचियासोबत झळकणार आहे

Web Title: Siddharth Jadhav with wife Trupti in Nach Baliye