श्वेता शिंदेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 06:00 IST2020-11-10T06:00:00+5:302020-11-10T06:00:00+5:30

श्वेता शिंदेला साडयांची विशेष आवड आहे. म्हणून श्वेताने या फोटोला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.

Shweta Shinde Look Gorgeous In Red Saree | श्वेता शिंदेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

श्वेता शिंदेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

झी युवावरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. श्वेता सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.  श्वेताला साडयांची विशेष आवड आहे. म्हणून श्वेताने या फोटोला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.

तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. लाल रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे. या साडीत श्वेताचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे. या फोटोवर श्वेताच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.  

 

डॉक्टर डॉन मालिकेत श्वेताचा लुक हा हटके आहे. ती रोज प्रेक्षकांना वेगवेगळ्या सुंदर साड्यांमध्ये वावरताना दिसते आणि त्यातीलच या लाल रंगाच्या साडीतील श्वेताच्या फोटोवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अवंतिका, अवाघाची हा संसार आणि वादळवाट या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.  आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलनं श्वेताने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांची यशस्वी निर्मिती केली.

साताऱ्यात जन्मलेली श्वेता पुढे शिक्षणासाठी मुंबईत आली. मालिका, चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून श्वेता शिंदेने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. स्वबळावर तिने स्वत:ची ओळख निर्माण केली. 'कुमकुम', 'घराना', या सारख्या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा श्वेता शिंदेने काम केले आहे.

सोज्वळ अंदाजात श्वेता जितकी सुंदर दिसते तितकीच वेस्टर्न आऊटफिटमध्येही ती सुंदर दिसते. तिचा प्रत्येक अंदाजावर तिचे चाहते फिदा होतात. सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे श्वेताचेही असंख्य चाहते आहे. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. 


 

Web Title: Shweta Shinde Look Gorgeous In Red Saree