शुभवी चोक्सीने मागितली हिना खानची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 20:00 IST2019-05-05T20:00:00+5:302019-05-05T20:00:00+5:30

लवकरच कोमोलिकाचं सत्य उघड व्हावे, यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून मालिकेच्या आगामी भागांत नाट्यमय घडामोडी पहायला मिळतील.

Shubhavi Choksey cannot stop Apologising to Hina Khan! | शुभवी चोक्सीने मागितली हिना खानची माफी

शुभवी चोक्सीने मागितली हिना खानची माफी

'कसौटी जिंदगी' या मालिकेचा नवा सिझन रसिकांना प्रचंड आवडत असून प्रत्येक भूमिकेला रसिकांनी पसंती दिली आहे.  मालिकेत आता नवीन वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे. लवकरच कोमोलिकाचं सत्य  उघड व्हावे, यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून मालिकेच्या आगामी भागांत नाट्यमय घडामोडी पहायला मिळतील. मालिकेत मोहिनी बसू ही सासूची भूमिका साकारणारी हिना खान कोमोलिकाच्या श्रीमुखात लगावताना दिसेल. मात्र या प्रसंगाचे चित्रीकरण संपल्यावर शुभादेवी चोक्सी यांनी हिना खानची वरंवार माफीही मागितली.


यानंतर हिना खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ  शेअर केला , ज्यात शुभादेवी तिची माफी मागताना दिसतात. त्यानंतर हिना खानने सांगितले की मला श्रीमुखात मारणे ही पटकथेची मागणी होती. पण मालिकेत का होईना, मला मारल्याबद्दल शुभादेवी चोक्सी यांना इतके वाईट वाटले की त्यांनी हिना खानला एक पुष्पगुच्छ पाठवला होता, सोबत एक शुभेच्छापत्र आणि एक छोटी चिठ्ठी लिहून पाठवली होती.
 

Web Title: Shubhavi Choksey cannot stop Apologising to Hina Khan!