'भाभीजी घर पर है'मधून शुभांगी अत्रेची एक्झिट, शिल्पा शिंदे साकारणार अंगूरी भाभी, म्हणाली- "तिने १० महिन्यांतच मालिका सोडली आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:52 IST2025-11-25T16:51:00+5:302025-11-25T16:52:04+5:30
शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारत होती. आता १० वर्ष अंगूरी भाभीची भूमिका साकारल्यानंतर शुभांगी अत्रे मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

'भाभीजी घर पर है'मधून शुभांगी अत्रेची एक्झिट, शिल्पा शिंदे साकारणार अंगूरी भाभी, म्हणाली- "तिने १० महिन्यांतच मालिका सोडली आणि..."
'भाभीजी घर पर है' ही टीव्हीवरील सर्वात गाजलेली मालिका. या मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेने दोन अभिनेत्रींचं नशीब उजळलं. श्वेता शिंदे आणि शुभांगी अत्रे या दोन अभिनेत्री अंगूरी भाभीच्या भूमिकेत दिसल्या. या दोघींनाही प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं. सुरुवातीला या मालिकेत श्वेता शिंदे अंगूरी भाभीच्या भूमिकेत होती. मात्र वर्षभरातच तिने ही मालिका सोडली होती. त्यानंतर शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारत होती. आता १० वर्ष अंगूरी भाभीची भूमिका साकारल्यानंतर शुभांगी अत्रे मालिकेतून एक्झिट घेणार आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी म्हणाली, "मालिकेत माझा प्रवास हा ज्याप्रकारे ऐटीत सुरू झाला होता. त्याचप्रकारे तो संपावा असं मी ठरवलं होतं. यापेक्षा चांगल्या फेअरवेलची अपेक्षा मी करू शकत नाही. रिप्लेसमेंट का होतेय, यामध्ये अडकायचं नाही. मी याला एका आशीर्वादाप्रमाणे मानते. एक आर्टिस्ट म्हणून मी नव्या भूमिका करू इच्छिते. इथून बाहेर पडल्यानंतर मला पुन्हा काम शोधायचं आहे. आयुष्यात इतक्या गोष्टी घडल्यानंतर मी आता खूप काही शिकले आहे. आता मला फक्त काम आणि माझ्या मुलीवर आयुष्य केंद्रीत करायचं आहे. ही मालिका सोडणं म्हणजे माझ्यासाठी घर सोडण्यासारखं आहे. शूटिंगच्या शेवटच्या काही दिवसांत मी इमोशनल झाले होते. या मालिकेने मला खूप काही दिलं आहे, त्यासाठी मी आभारी आहे".
शिल्पा शिंदेने २०१६मध्ये ही मालिका सोडली होती. त्यानंतर अंगूरी भाभी बनून शुभांगीने तिला रिप्लेस केलं होतं. आता पुन्हा शिल्पा शिंदे अंगूरी भाभीच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत ती म्हणाली, "कोणाची जागा घेणं कधीच सोपं नसतं. जेव्हा तुम्ही कोणती भूमिका करत असता तेव्हा तुम्ही त्या भूमिकेला तुमच्या पद्धतीने आकार देत असता. पण, जेव्हा कोणीतरी आधी साकारलेली भूमिका तुमच्या वाट्याला येते तेव्हा त्या भूमिकेतील महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला तशाच ठेवाव्या लागतात. प्रेक्षकांसोबत तसंच बॉण्डिंगही बनवावं लागतं".
पुढे ती म्हणाली, "रिप्लेसमेंटचा हा खेळ मी आता संपवत आहे. मी माझ्या आईला बोलले होते की शिल्पाने १० महिन्यांतच ही मालिका सोडली होती. तेव्हा ती मला असं वाटलं होतं की तिने भूमिकेच्या रुपात नवीन बाळ माझ्याकडे सुपूर्द केलं आहे. मी त्या बाळाला १० वर्ष सांभाळलं, वाढवलं आणि आता मी ते तिला परत करत आहे. मी शिल्पा आणि संपूर्ण टीमला मालिकेच्या 2.0 साठी शुभेच्छा देते".