‘कसौटी जिंदगी की 2’ची मोहिनी बासू ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:25 IST2019-06-21T12:24:13+5:302019-06-21T12:25:52+5:30

‘कसौटी जिंदगी की 2’ मालिकेत मोहिनी बासू कायम भरजरी साड्यांमध्ये दिसते. पण ही मोहिनी अर्थात शुभावी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

shubhaavi choksey play anurag mother role in kasautii zindagi ki2, real life pics |   ‘कसौटी जिंदगी की 2’ची मोहिनी बासू ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस! पाहा, फोटो!!

  ‘कसौटी जिंदगी की 2’ची मोहिनी बासू ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस! पाहा, फोटो!!

ठळक मुद्देएकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ यातही शुभावी होती. यात ती निगेटीव्ह भूमिकेत होती.

कसौटी जिंदगी की 2’ हा शो सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अनुराग-प्रेरणा यांच्यातील प्रेम फुलत असताना मालिकेत मिस्टर बजाजची एन्ट्री झालीय. पण आज आम्ही प्रेरणा, अनुराग वा मिस्टर बजाज यांच्याबद्दल नाही तर अनुरागची आई मोहिनी बासू हिच्याबद्दल सांगणार आहोत. होय, अभिनेत्री शुभावी चौकसी ही या मालिकेत अनुरागच्या आईची अर्थात मोहिनी बासूची भूमिका साकारते आहे. प्रेरणा, कमोलिकाप्रमाणेच मोहिनी बासूच्या साड्यांचे डिझाईन, तिची ज्वेलरी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मोहिनी बासू मालिकेत कायम भरजरी साड्यांमध्ये दिसते. पण ही मोहिनी अर्थात शुभावी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. मोहिनी बासू या भूमिकेच्या उलट ख-या आयुष्यात ती प्रचंड मॉडर्न आणि फॅशनेबल आहे.


शुभावी चौकसीला याआधी तुम्ही जान्हवी कपूर व ईशान खट्टरच्या ‘धडक’ या चित्रपटात पाहिले असेल. या चित्रपटात शुभावीने जान्हवीच्या शेजारणीची भूमिका साकारली होती.

यापूर्वी एकता कपूरच्याच ‘कहानी घर घर की’ या हिट शोमध्ये शुभावी दिसली होती. या मालिकेत शुभावीने पार्वती अग्रवालची वकील रिषिकाची भूमिका साकारली होती. या शोने शुभावीला चांगली ओळख दिली होती.

एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ यातही शुभावी होती. यात ती निगेटीव्ह भूमिकेत होती.

शुभावी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक फोटो ती शेअर करत असते.

तिचे हे फोटो पाहून हीच मोहिनी बासू आहे, यावर क्षणभर विश्वास बसणार नाही.

कसौटी जिंदगी की 2’ ही मालिका सध्या टीआरपी लिस्टमध्ये टॉपवर आहे. काल गुरुवारी या मालिकेत मिस्टर बजाजची एन्ट्री झाली. या मालिकेत पुढे काय होते, त्याची उत्सुकता असेलच. तूर्तास शुभावीचे काही रिअल लाईफ फोटो बघुयात...

Web Title: shubhaavi choksey play anurag mother role in kasautii zindagi ki2, real life pics