'माझी तुझी रेशीमगाठ २' च्या चर्चांदरम्यान श्रेयसने शेअर केला मजेशीर Video, प्रार्थनाची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:50 PM2023-07-06T12:50:27+5:302023-07-06T12:52:05+5:30

श्रेयस एका शूट लोकेशनवर दिसत असून त्याने सेटवरुनच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

shreyas talpade shared video with a hint of majhi tujhi reshimgath 2 prarthana behere comments | 'माझी तुझी रेशीमगाठ २' च्या चर्चांदरम्यान श्रेयसने शेअर केला मजेशीर Video, प्रार्थनाची कमेंट

'माझी तुझी रेशीमगाठ २' च्या चर्चांदरम्यान श्रेयसने शेअर केला मजेशीर Video, प्रार्थनाची कमेंट

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. मालिकेतून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहेरेची (Prarthana Behere) जोडी घराघरात पोहोचली. तर याच मालिकेमुळे 'परी' म्हणजेच सर्वांची लाडकी गोड मायरा वायकूळशी ओळख झाली. मालिका बंद झाल्याने प्रेक्षक चांगलेच नाराज झाले होते. 'माझी तुझी रेशिमगाठ'चा भाग २ कधी येणार असंच सगळे विचारत आहेत. आता श्रेयसने एक असा व्हिडिओ अपलोड केलाय ज्यामुळे मालिकेच्या दुसऱ्या भागाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

श्रेयस एका शूट लोकेशनवर दिसत असून त्याने सेटवरुनच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो, 'अगर आप किसी चीज को पुरे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे लग जाती है' आम्हाला दोघांनाही असं मनापासून वाटत होतं की भेटावं पण तशी वेळच येत नव्हती. पण दोघांच्याही मनात ते सतत होतं. विशेषत: माझी तुझी रेशिमगाठ जे चाहते आहेत त्यांना आज हे बघून आनंद होईल की आज काहीही न ठरवता आमच्या दोघांचे शूटिंग एकाच लोकेशनला ठरलं. आम्ही एकमेकांसमोर आला त्यात पाऊस पडत होता. आमची भेट झालीच आणि ही रेशिमगाठ पुन्हा एकदा जुळून आली. आज मी तुम्हाला भेटवतोय माझ्या डार्लिंगशी' असं म्हणत श्रेयस समोर मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर असतात.

श्रेयस व्हिडिओतून अजय मयेकर यांना विनंती करतो की जोवर 'माझी तुझी रेशिमगाठ' २ बद्दल सांगत नाही तोवर जाऊ देणार नाही. तेव्हा अजय मयेकर म्हणतात,'सर मला जाऊ द्या माझं शूट आहे. मालिकेसाठी तुमच्या तारखा नाहीत, मॅडमच्या तारखा नाहीत'.

'आमची ही रेशीमगाठ' कधी तुटायची नाही असं कॅप्शन त्याने दिलं आहे. श्रेयसच्या या व्हिडिओवर प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे. ती लिहिते,'तुमच्या दोघांसाठी माझ्या तारखा नेहमीच मोकळ्या असतील. उफ्फ..मी ही मजा मिस करत आहे.'

Web Title: shreyas talpade shared video with a hint of majhi tujhi reshimgath 2 prarthana behere comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.