श्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळी दिसणार ह्या रिएलिटी शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:40 IST2019-01-07T20:40:00+5:302019-01-07T20:40:00+5:30

‘द व्हॉइस’ने जगातील १८० देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले असून आता हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीवर दाखल होणार आहे.

Shraddha Kapoor and Sanjay Leela Bhansali will appear in the reality show | श्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळी दिसणार ह्या रिएलिटी शोमध्ये

श्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळी दिसणार ह्या रिएलिटी शोमध्ये

ठळक मुद्देश्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळीला परीक्षक म्हणून दिसू शकतात ‘दि व्हॉईस’ शोमध्ये‘द व्हॉइस’ कार्यक्रम लवकरच स्टार प्लसवर होणार दाखल

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला शो ‘दि व्हॉईस’ने जगभरात वादळ निर्माण केले असून आता हा शो भारतात केवळ स्टार प्लसवर येत असून तो एका अल्टिमेट व्हॉईसच्या शोधात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ह्या शोच्या तोडीस तोड राहण्यासाठी मोठे परिश्रम घेण्यात येत असून ह्या शोसाठी बॉलिवूडची आशिकी गर्ल अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अव्वल दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना विचारण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, “निर्मात्यांनी गुणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘दि व्हॉईस’ शोमध्ये सेलेब्रिटी कोचेस बनण्यासाठी विचारले आहे. श्रद्धा कपूर तिच्या गायनासाठी मानली जाते तर संजय लीला भन्साळी हेही संगीतात निपुण आहेत. त्यामुळे हे दोघेही ह्या शोसाठी योग्य निवड आहेत. जर ते ह्या शोमध्ये आले तर खूपच छान होईल.”
तसेच या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी महान संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते. या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ए. आर. रेहमान यांच्याकडे या कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा अजून सुरू आहे आणि आम्ही त्यांच्या अधिकृत होकाराची प्रतीक्षा करीत आहोत. रेहमान जर या कार्यक्रमात सहभागी झाले, तर हिंदी सामान्य मनोरंजन वाहिनीवरील कार्यक्रमात ते प्रथमच सहभागी होतील. यापूर्वी जगभर शकिरा, ख्रिस्तिना, अ‍ॅडाम लेव्हिन, अशर, मायली सायरस यासारखे आघाडीचे पॉप गायक या कार्यक्रमात प्रशिक्षक या नात्याने सहभागी झाले होते. रेहमान हेही जगभर एक नामवंत संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कार्यक्रमात त्यांच्यासारखी नामवंत व्यक्तीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती नक्कीच सुसंगत ठरेल. या कार्यक्रमातील अन्य प्रशिक्षकांची नावंही अजून निश्चित झालेली नाहीत. भारतातील या कार्यक्रमाचा दर्जाही त्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जासारखाच उच्च ठेवण्यासाठी निर्माते कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत.”

Web Title: Shraddha Kapoor and Sanjay Leela Bhansali will appear in the reality show