'अबीर गुलाल' मालिकेत धक्कादायक वळण, शुभ्राच्या डावामुळे श्री संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 18:50 IST2024-11-09T18:49:25+5:302024-11-09T18:50:48+5:30

Abir Gulal Serial : 'अबीर गुलाल' प्रेक्षकांना रोज नव्या वळणांनी चकित करत आहे. श्री आणि अगस्त्यच्या लग्नानंतर शुभ्राची मत्सराने भरलेली खेळी सुरू आहे.

Shocking twist in 'Abir Gulal' series, Shubra's innings in Sri Sankat | 'अबीर गुलाल' मालिकेत धक्कादायक वळण, शुभ्राच्या डावामुळे श्री संकटात

'अबीर गुलाल' मालिकेत धक्कादायक वळण, शुभ्राच्या डावामुळे श्री संकटात

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अबीर गुलाल' (Abir Gulal Serial ) प्रेक्षकांना रोज नव्या वळणांनी चकित करत आहे. श्री आणि अगस्त्यच्या लग्नानंतर शुभ्राची मत्सराने भरलेली खेळी सुरू आहे. श्रीला घरच्यांच्या नजरेतून खाली उतरवण्यासाठी शुभ्राने पुन्हा एक नवा डाव खेळला आहे. कालच्या भागात शुभ्राने खेळलेल्या नवीन डावामुळे आता संपूर्ण घर श्रीच्या विरोधात उभं राहिलं आहे. श्रीने विशालला दिलेल्या गिफ्टमध्ये शुभ्राने हुशारीने लपवलेले तिच्या आणि अगस्त्यच्या पूर्वीच्या लग्नाचे फोटो पाहून विशाल संतापला आणि फोटो जाळून टाकले.

अलीकडच्या भागात, श्रीने विशालला गिफ्ट दिले. मात्र शुभ्राने आपल्या धूर्तपणाचा वापर करून त्या गिफ्टमध्ये स्वतःचे आणि अगस्त्यचे पूर्वी ठरलेल्या लग्नाचे फोटो ठेवले. हे फोटो पाहून विशाल संतापतो आणि भावनेच्या भरात फोटो जाळून टाकतो. परंतु, शुभ्राला नेमकं हेच हवं होतं. या सगळ्याचा संशय श्रीवर यावा यासाठी शुभ्राने ही खेळी खेळली. 

शुभ्राने केलेला डाव ठरला यशस्वी

आजच्या भागात घरातील सगळ्यांचा संशय श्रीवर जावा, म्हणून शुभ्राने केलेला डाव यशस्वी ठरला आहे. अगस्त्य आणि घरातील सगळे श्रीवर नाराज आहेत. मात्र, शुभ्रा यामुळे खूप आनंदी आहे. आता श्री या अडचणींचा सामना कसा करणार? ती पुन्हा घरच्यांचा विश्वास कसा मिळवणार? आणि शुभ्राचं सत्य समोर आणण्यात तिला यश मिळणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Shocking twist in 'Abir Gulal' series, Shubra's innings in Sri Sankat