'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक वळण; गौरीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 14:21 IST2022-01-24T14:20:57+5:302022-01-24T14:21:26+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata : सध्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये जयदीप व गौरीच्या हनीमूनचा ट्रॅक सुरू आहे. मात्र आता मालिकेत धक्कादायक वळण येणार आहे.

Shocking turn in 'Sukh Mhanje Nakki Kay Asata'; A new storm will come in Gauri's life | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक वळण; गौरीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक वळण; गौरीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं  (Sukh Mhanje Nakki Kay Asta)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. नुकतेच त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर जयदीप आणि गौरी आता हनीमूनला गेली आहे. सध्या मालिकेत जयदीप व गौरीच्या हनीमूनचा ट्रॅक सुरू आहे. मात्र आता मालिकेत धक्कादायक वळण येणार आहे. ज्यामुळे गौरीच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे. याचा परिणाम शिर्के -पाटील कुटुंबावर देखील होणार आहे.

नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात पाहायला मिळत आहे की, गौरी आणि शालिनी माईंसोबत अंबाबाईकडे कौल लावायला जातात. यावेळी त्यांच्यासोबत इतर विवाहित बायकादेखील पाहायला मिळत आहेत. त्यावेळी जोगतीण सांगते की, जिच्या वाटीत जितकी फुले पडतील तिला तितकी मुले देवी फळ म्हणून देणार आहे. फुले टाकल्यानंतर माई गौरीला तुझ्या वाटीत बघ किती फुले आहेत. त्यावेळी गौरी वाटी पाहते तर ती रिकामी असते. तेव्हा शालिनी बोलते माझं ठीक आहे पण तुला पण मुल होणार नाही. या सर्व प्रकारामुळे गौरीला धक्का बसतो.   


अंबाबाईने गौरीला ती कधीच आई होणार नाही असा कौल दिला आहे. मात्र हा कौल खरा आहे की शालिनीचे नवे कारस्थान आहे, हे आगामी भागात समजेल. तसेच गौरीच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या वादळाचा गौरी कसा सामना करणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. या सगळ्यात जयदीप गौरीच्या बाजून उभा राहणार की तिची साथ सोडून देणार हे देखील लवकरच समजेल.

Web Title: Shocking turn in 'Sukh Mhanje Nakki Kay Asata'; A new storm will come in Gauri's life