Bigg Boss Marathi 2 : आणि शिवानीला रडू कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 16:49 IST2019-08-03T16:15:12+5:302019-08-03T16:49:47+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्य बर्‍याच दिवसांनी आपल्या मनातील भावना स्वत:च्या परिवारातील जवळच्या व्यक्तींना सांगत आहे.

Shivani surve cried in bigg boss marathi house | Bigg Boss Marathi 2 : आणि शिवानीला रडू कोसळले

Bigg Boss Marathi 2 : आणि शिवानीला रडू कोसळले

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्य बर्‍याच दिवसांनी आपल्या मनातील भावना स्वत:च्या परिवारातील जवळच्या व्यक्तींना सांगत आहे... खूप काही मनामध्ये साठलेले आहे, खूप काही त्यांना बोलायचे आहे सगळे सदस्य बिग बॉस यांनी दिलेल्या या संधीमध्ये ते सांगत आहेत...  अभिजीत बिचुकले यांची आईसोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलं देखील घरामध्ये येऊन गेले..

 त्यांचा मुलगा महाराज आणि मुलगी... बिचुकलेंनी खूप आधी घरामध्ये असे सांगितले होते की, माझी मुलगी शिवानी सारखी पाहिजे... त्यांची मुलगी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यावर त्यांनी तिला शिवानीच्या मांडीत ठेवायले सांगितले... आणि यामुळेच शिवानीला अश्रु अनावर झाले... त्यावर बिचुकलेंच्या पत्नीने शिवानीला सांगितले की, का रडायचे ? काय झालं एवढं ? झालं गेलं सारं विसरून जायच, खेळ आहे ना हा... नाही रडायंच इथं... तरीदेखील शिवानीचे अश्रु थांबायचे नाव घेत नव्हते... यावेळेस बिचुकले यांची आई म्हणाली, “अभिजीत म्हणालाना शिवानीसारखी पोरगी पाहिजे……” म्हणूनच शिवानीला रडू कोसळले असावे कदाचित... 

Web Title: Shivani surve cried in bigg boss marathi house