शिवानीला मिळाले सेटवर वाढदिवसाचे असे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 11:11 IST2019-03-14T11:11:26+5:302019-03-14T11:11:33+5:30

'लागीरं झालं जी' मालिकेती शीतलची भूमिका साकारत असलेल्या शिवानी बावकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

shivani baokar got birthday surprise on set | शिवानीला मिळाले सेटवर वाढदिवसाचे असे सरप्राईज

शिवानीला मिळाले सेटवर वाढदिवसाचे असे सरप्राईज

ठळक मुद्देशिवनीसाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं

झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' मालिकेती शीतलची भूमिका साकारत असलेल्या शिवानी बावकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नुकताच वाढदिवस झाला आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकारांनी तिला एक खास सरप्राईज दिलं.

मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री बारा वाजता तिला बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं आणि तिकडे शीतलचा सर्व मालिकेची कास्ट आणि क्रू हजार होती. पूर्ण टेरेस फुग्यांनी सजवलं होतं. शिवानीने केक कापला आणि तसेच दुसऱ्यांना त्रास होणाऱ्या अशा आवाजात म्युझिक लावून एक छोटी पार्टी केली, असं शिवानीने सांगितलं. शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिचे आईवडील देखील खास तिला भेटायला मुंबईवरून साताऱ्याला गेले. शिवानीने त्यांच्यासोबत देखील वेळ घालवला, महाबळेश्वरला गेली आणि परत सेटवर आली तेव्हा परत सेटवर सर्व कलाकारांनी शिवानीला केक कापायला लावला. शिवनीसाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं.

याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, "वाढदिवसाचादिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचं आनंद अपूर्ण आहे. मी माझ्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसंच लागीरं झालं जीच्या माझ्या या कुटुंबाने देखील मला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि हा वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही."
 

Web Title: shivani baokar got birthday surprise on set