शिवा – सिध्दीच्या नात्याची होणार नवी सुरुवात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 15:24 IST2019-09-17T15:13:18+5:302019-09-17T15:24:27+5:30

प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो... असे म्हणतात नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर कुठल्याही संकटाला सामोरी जाण्याचे बळ येते.

Shiva - Will Siddhi's Relations Begin in jeev zala yeda pisa serial ? | शिवा – सिध्दीच्या नात्याची होणार नवी सुरुवात ?

शिवा – सिध्दीच्या नात्याची होणार नवी सुरुवात ?

प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो... असे म्हणतात नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर कुठल्याही संकटाला सामोरी जाण्याचे बळ येते. पण लग्ना आधीपासुनच शिवा आणि सिद्धीचे एकमेकांशी कधीच पटले नाही. मग त्यामागे शिवाची वागणूक असो, त्याचे विचार असो वा त्याचा आत्याबाईंना असलेला पाठिंबा असो... तर शिवाला देखील सिद्धी एक क्षण देखील समोर सहन होत नाही... पण हळूहळू मात्र या दोघांचे नाते बदलू लागले. शिवाचे कधी  सिद्धीला कधी तिच्या घरच्यांना मदत करणे, तिची काळजी घेणे, सिद्धीसाठी शिवाचे आईच्या विरोधात जाणे या सगळ्या गोष्टींमुळे सिद्धीला कुठेतरी आता शिवाबद्दल आपुलकी, प्रेम वाटु लागले आहे... पण शिवाच्या मनामध्ये नक्की काय आहे ? त्यालासुध्दा सिद्धीबद्दल आपुलकी वाटते आहे का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.


 
शिवा सिद्धीमागे नेहेमीच खंबीरपणे उभा राहिला आहे, वारंवार आलेल्या अडचणीमधून त्याने सिद्धीला बाहेर काढले आहे, तर सिद्धीने देखील शिवाच्या कुटुंबाची अगदी स्वत:च्या घरातील माणसांप्रमाणे काळजी घेतली आहे, त्यांना प्रेम दिले आहे... पण शिवाचे चांगले वागणे हे फक्त पक्षकार्य आहे का ? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. कारण, जलवासोबत बोलत असताना शिवाने तशी कबुली दिली की, जे काही तो सिद्धीसोबत चांगले वागत आहे ते निव्वळ आत्याबाईंना दिलेल्या शब्दाखातर बाकी त्याच्या मनामध्ये सिद्धीबद्दल असे काही नाही... पुढे मालिकेमध्ये काय होणार ? ही खरच शिवा आणि सिद्धीच्या नात्याची गोड सुरुवात असेल ? 
 

Web Title: Shiva - Will Siddhi's Relations Begin in jeev zala yeda pisa serial ?