शिव ठाकरेने रोमँटिक अंदाजात केले वीणा जगतापला प्रपोज, पाहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:56 IST2019-10-01T10:55:23+5:302019-10-01T10:56:28+5:30

वीणाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शिव रोमँटिक अंदाजात वीणाला प्रपोज करताना दिसत आहे.

Shiva Thackeray proposes Veena Jagtap to Romantic, see this photo | शिव ठाकरेने रोमँटिक अंदाजात केले वीणा जगतापला प्रपोज, पाहा हा फोटो

शिव ठाकरेने रोमँटिक अंदाजात केले वीणा जगतापला प्रपोज, पाहा हा फोटो

ठळक मुद्देशिव रस्त्याच्या मधोमध गुडघ्यांवर बसून वीणाला प्रपोज करत असून वीणा आणि शिवच्या चेहऱ्यावर खूप छान हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दोघांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोला केवळ एका दिवसांत 78 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपून जवळजवळ महिना झाला आहे. मात्र या सीझनची चर्चा अद्याप होताना पाहायला मिळते आहे. याचं कारण आहे यंदाच्या सीझनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं अफेयर. बिग बॉस मराठी २ च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर त्यावेळी बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरू झाला आहे.

बिग बॉस मराठी २ शो संपल्यानंतर आता वीणा आणि शिव यांची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. वीणाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शिव रोमँटिक अंदाजात वीणाला प्रपोज करताना दिसत आहे. शिव रस्त्याच्या मधोमध गुडघ्यांवर बसून वीणाला प्रपोज करत असून वीणा आणि शिवच्या चेहऱ्यावर खूप छान हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दोघांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोला केवळ एका दिवसांत 78 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर शिव आणि वीणाची जोडी आम्हाला खूप आवडते. तसेच शिवचा हा रोमँटिक अंदाज आम्हाला खूप भावला असे लोक प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.

शिव आणि वीणा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते. घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला लग्नाविषयी विचारले असता त्याने सांगितले होते की, आता घराबाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे. आता ते दोघे लग्न कधी करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.


 

Web Title: Shiva Thackeray proposes Veena Jagtap to Romantic, see this photo