"मी बाकी आळशी असले तरीही.."; 'सर्वोत्कृष्ट नायिका' सन्मान मिळाल्यावर 'शिवा' फेम अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 12:28 IST2024-10-28T12:26:34+5:302024-10-28T12:28:31+5:30

मी बाकी आळशी असले तरीही..; 'सर्वोत्कृष्ट नायिका' सन्मान मिळाल्यावर 'शिवा' फेम अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

shiva marathi serial actress purva kaushik feeling emotional at zee gaurav award 2024 | "मी बाकी आळशी असले तरीही.."; 'सर्वोत्कृष्ट नायिका' सन्मान मिळाल्यावर 'शिवा' फेम अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

"मी बाकी आळशी असले तरीही.."; 'सर्वोत्कृष्ट नायिका' सन्मान मिळाल्यावर 'शिवा' फेम अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

झी गौरव पुरस्कार २०२४ काल थाटामाटात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात झी मराठीमधील उत्कृष्ट मालिकांचा आणि त्या मालिकांमधील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. झी चॅनलची २५ वर्ष आणि त्यात कलाकारांच्या उत्साहात पार पडलेला गौरव सोहळा हा दुग्दशर्करा योग जुळून आला. यावेळी सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून 'शिवा' मालिकेत शिवाची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक-फडकेचा गौरव झाला. पूर्वाने याविषयी सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्या

अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली की, "हे सगळं खूप जास्त भारावून टाकणारं आहे.. एखादी गोष्ट सातत्याने करत राहणं,आपल्या कामात सातत्य असणं हे खूप काहीं देऊन जातं आपल्याला.. मी बाकी आळशी असले तरी अभिनयाला मझ्या सातत्य होतं आणि कायम असेल.. ह्या सतात्यामुळे शिवा ही गोष्ट मझ्यासाठी खूप जास्त जवळची आणि मोठी घडली.. झी मराठी ची सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून मला सन्मान दिला... बऱ्याच गोष्टींचं चीझ झाल्यासारखं वाटतंय.."


पूर्वा कौशिक पुढे म्हणाली, "झी मराठीचं २५ वं वर्ष आणि त्यात माझा सहभाग असणं हीच मुळात मोठी गोष्ट आहे.. ह्या सगळ्या साठी झी मराठी चे खूप आभार .... आणि जगदंब प्रोडक्शन चे ही खूप खूप आभार.. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय.... हा मझ्या आयुष्यातला सगळ्यात हळवा, भारावून टाकणारा , खुश करणारा क्षण आहे... आणि मला तुम्ही हा अनुभव दिलात त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार .. मी कायम ऋणी असेन ... आणि असच सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करत राहीन...." 

Web Title: shiva marathi serial actress purva kaushik feeling emotional at zee gaurav award 2024