अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 04:10 PM2023-04-19T16:10:57+5:302023-04-19T16:12:02+5:30

रिप्लायच नाही तर थेट ट्वीटच आलं, पण हे बघायला शिवचा चाहता या जगात नाही

shiv thakre condolence message gets to know about his fan's sad demise because of cancer | अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट

अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट

googlenewsNext

बिग बॉस या लोकप्रिय शो मुळे चर्चेत आलेला अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakre) सर्वांचाच लाडका आहे. अमरावतीचा हा वाघ त्याच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवने मराठी बिग बॉसचे विजेतेपद पटाकावले आणि नंतर हिंदी बिग बॉसमध्येही आपला डंका गाजवला. 

शिवला नुकतीच एक दु:खद बातमी समजली.  त्याच्या एका चाहत्याचं कॅन्सरमुळे निधन झालं. यामुळे शिवने ट्वीट करत लिहिले,'आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचं समजलं. या कठीण प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला बळ येवो.'

शिवच्या या ट्वीटवर एकाने रिप्लाय केला की,'त्याला तुमच्याकडून एक रिप्लाय हवा होता आणि आता त्याच्यासाठी पूर्ण ट्वीट केलं गेलंय. आयुष्य हे खरंच किती अनपेक्षित आहे. तर आणखी एकाने लिहिले,'तो तुमचा मोठा चाहता होता. शेवटपर्यंत त्याने हार मानली नव्हती.'

शिव सध्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. लवकरच तो रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' या शोमध्येही दिसणार आहे. त्याला स्टंट करताना पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याशिवाय तो रुबिना दिलाईक, अर्चना गौतम यांच्यासोबत एका रिअॅलिटी शो मध्येही दिसत आहे.

Web Title: shiv thakre condolence message gets to know about his fan's sad demise because of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.