शिव ठाकरेने लग्नाच्या 'त्या' फोटोचं सत्य सांगितलं, आईचा ओरडा अन् लोकांच्या शिव्या खाल्ल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:00 IST2026-01-30T13:59:03+5:302026-01-30T14:00:00+5:30

लग्नाच्या 'त्या' पोस्टबाबत शिव ठाकरेचा खुलासा, सत्य सांगत म्हणाला "काही गोष्टी "

Shiv Thakare Wedding Prank Backfired The 50 Contestant Reveals The Full Truth Behind The Viral Post | शिव ठाकरेने लग्नाच्या 'त्या' फोटोचं सत्य सांगितलं, आईचा ओरडा अन् लोकांच्या शिव्या खाल्ल्या

शिव ठाकरेने लग्नाच्या 'त्या' फोटोचं सत्य सांगितलं, आईचा ओरडा अन् लोकांच्या शिव्या खाल्ल्या

मराठी आणि हिंदी 'बिग बॉस' गाजवलेला आपला लाडका शिव ठाकरे पुन्हा एकदा एका मोठ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'The 50' या अनोख्या शोमध्ये शिव स्पर्धक म्हणून सहभागी होतोय. या शोमध्ये एन्ट्री घेण्याआधी शिवनं सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करून चाहत्यांसोबत प्रँक केला होता. पण, हा प्रँक शिवला इतका महागात पडलं की, त्याला लोकांच्या शिव्याही खाव्या लागल्या. या संपूर्ण प्रकरणावर शिवने आता भाष्य केलंय.

काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेने सोशल मीडियावर लग्नाच्या लूकमधील एक फोटो शेअर केला होता, ज्याला त्याने "Finally" असं कॅप्शन देऊन हार्ट इमोजी टाकला होता. हा फोटो पाहताच चाहत्यांना वाटलं की शिवने गुपचूप लग्न उरकलं आहे. चाहत्यांनी शिव ठाकरेला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण, तसं नव्हतं. तो फोटो एका प्रोजक्टचा भाग होता. पण, हा चाहत्यांसोबत हा प्रँक करणं शिवला चांगलंचं महागात पडलं. 

'फ्री प्रेस जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे म्हणाला, "काही गोष्टी माझ्याही हातात नसतात. तो एका शूटमधील फोटो होता. मला वाटलं होतं की २०२६ मधील पहिल्या शूटसाठी काहीतरी सोशल मीडियावर पोस्ट करावं. माझा विचार होता की दुसऱ्या दिवशी मी स्पष्ट करेन की हे २०२६ मधील पहिल्या शूटसाठीचं पोस्ट आहे. पण मला कल्पनाच नव्हती की ही मस्करी इतकी वाढेल. आईनेही विचारलं, 'हे काय चाललंय?' लोक मला फोन करत होते आणि या सगळ्यासाठी मला खूप शिव्याही खाव्या लागल्या".

शिवचा 'The 50' कधीपासून येतोय?
१ फेब्रुवारी २०२६ पासून 'कलर्स टीव्ही'वर सुरू होणारा 'The 50' हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे.  मात्र, शोचा खरा होस्ट कोण असेल, याबाबत निर्मात्यांनी अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे. यात टीव्ही आणि रिअ‍ॅलिटी शोमधील ५० दिग्गज कलाकार एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे, हा शो बिग बॉससारखा प्रेक्षकांच्या मतदानावर अवलंबून नसेल, तर याचे नियम पूर्णपणे वेगळे आणि मनोरंजक असणार आहेत.सोशल मीडियावर सक्रिय असणारा शिव आता 'The 50'  मध्ये आपली काय कमाल दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : शिव ठाकरे ने शादी की फोटो का सच बताया, मिली माँ से डांट।

Web Summary : शिव ठाकरे की शादी की तस्वीर का प्रैंक उल्टा पड़ा, आलोचना और माँ से डांट मिली। उन्होंने स्पष्ट किया कि यह एक शूट से थी, असली शादी नहीं। 'द 50,' जिसमें 50 सितारे हैं, 1 फरवरी, 2026 को कलर्स टीवी पर प्रीमियर होगा।

Web Title : Shiv Thakare reveals truth behind wedding photo, faced backlash.

Web Summary : Shiv Thakare's wedding photo prank for 'The 50' backfired, drawing criticism and a scolding from his mother. He clarified it was from a shoot, not a real wedding. 'The 50,' featuring 50 stars, premieres February 1, 2026, on Colors TV.