शिव ठाकरेने जाहीर केला 'बिग बॉस मराठी ६' मधील आपला आवडता स्पर्धक; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:45 IST2026-04-03T16:32:53+5:302026-04-03T16:45:39+5:30

 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत.

Shiv Thakare Supports Vishal Kotian Bigg Boss Marathi 6 Marathi | शिव ठाकरेने जाहीर केला 'बिग बॉस मराठी ६' मधील आपला आवडता स्पर्धक; म्हणाला...

शिव ठाकरेने जाहीर केला 'बिग बॉस मराठी ६' मधील आपला आवडता स्पर्धक; म्हणाला...

Shiv Thakare : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेल्या या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.  अशातच लोकप्रिय रिअ‍ॅलिटी स्टार शिव ठाकरे  'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनबद्दल आणि त्यातील त्याच्या आवडत्या स्पर्धकाबद्दल भाष्य केले आहे.

'बिग बॉस मराठी ६' आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत शिव म्हणाला, "मी 'द ५०' मध्ये व्यस्त असल्याने हा संपूर्ण सीझन फॉलो करू शकलो नाही. पण मी काही क्लिप्स पाहिल्या आहेत आणि शोला चांगला टीआरपी मिळत असल्याचा मला अभिमान वाटतो. ज्या शोने मला ओळख दिली, तो हिट होतोय हे पाहून आनंद होतो".

जेव्हा त्याला आवडत्या स्पर्धकाबद्दल विचारले, तेव्हा त्याने स्पष्टपणे विशाल कोटियनयाचे नाव घेतले. शिव म्हणाला, "मी गेम पूर्ण पाहिला नसला तरी विशाल माझा खूप जवळचा मित्र आहे. त्यामुळे माझा पाठिंबा त्यालाच असेल". विशेष म्हणजे, याआधी शिवने अमरावतीच्या रोशन भजनकरला देखील पाठिंबा दिला होता.

या मुलाखतीत शिवने मराठी सिनेसृष्टीत काम करण्याच्या आपल्या इच्छेबद्दलही मोकळेपणाने सांगितले. तो मिश्किलपणे म्हणाला, "मी मराठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना का दिसत नाहीये, हेच मला समजत नाहीये". मात्र, त्याने चाहत्यांना आशाही दिली की सध्या काही लोकांसोबत चर्चा सुरू असून, तो लवकरच एका मराठी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.

शोमध्ये रेवा कौरासे ठरली शेवटची कॅप्टन
दुसरीकडे, 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या रंजक वळण आले आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री ठरलेली रेवा कौरासे या सीझनची शेवटची कॅप्टन ठरली आहे. आता कॅप्टन्सी टास्क संपल्यामुळे घराचे सर्व लक्ष ग्रँड फिनालेकडे लागले आहे

Web Title : शिव ठाकरे ने बताया 'बिग बॉस मराठी 6' का पसंदीदा प्रतियोगी

Web Summary : शिव ठाकरे ने 'बिग बॉस मराठी 6' में विशाल कोटियन का समर्थन किया। उन्होंने शो की सफलता पर गर्व जताया और मराठी फिल्मों में काम करने की इच्छा जाहिर की।

Web Title : Shiv Thakare Reveals Favorite 'Bigg Boss Marathi 6' Contestant

Web Summary : Shiv Thakare, ex-'Bigg Boss' contestant, supports Vishal Kotian in 'Bigg Boss Marathi 6'. He expressed pride in the show's success and hinted at upcoming Marathi film roles.