"जर आग बेडरुमपर्यंत आली असती तर...", दुर्घटनेवेळी घरातच होता शिव ठाकरे, सांगितलं नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:02 IST2025-11-19T17:01:55+5:302025-11-19T17:02:21+5:30
शिव ठाकरेने आग लागली तेव्हा तो घरातच होता असं म्हटलं आहे. नेमकं काय घडलं हे शिव ठाकरेने सांगितलं आहे.

"जर आग बेडरुमपर्यंत आली असती तर...", दुर्घटनेवेळी घरातच होता शिव ठाकरे, सांगितलं नेमकं काय घडलं?
'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला मंगळवारी(१८ नोव्हेंबर) आग लागली होती. या आगीत शिव ठाकरेच्या घराचं मोठं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती शिवने पोस्ट करत चाहत्यांना दिली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागली तेव्हा शिव ठाकरे घरात नसल्याची माहिती त्याच्या टीमकडून देण्यात आली होती. मात्र आता शिव ठाकरेने आग लागली तेव्हा तो घरातच होता असं म्हटलं आहे. नेमकं काय घडलं हे शिव ठाकरेने सांगितलं आहे.
शिव ठाकरेने हिंदुस्तान टाइम्सला नेमकी आग कशी लागली आणि कशामुळे लागली हे सांगितलं. तो म्हणाला, "१० सेकंद मला काहीच कळत नव्हतं की काय झालंय. मग मी माझ्या मित्राला फोन लावला आणि लगेचच फायर ब्रिगेडला बोलवलं. अग्निशामन दलही ५ मिनिटांत पोहोचलं. ही सोसायटी चांगली आहे. पण, आग लागल्यावर ना सायरन वाजला ना कुठून पाणी आलं. हा टेक्निकल इश्यू आहे. नशीब आग हॉलमध्येच लागली. जर ती बेडरुमपर्यंत पोहोचली असती तर मला बाहेरच पडता आलं नसतं".
"मॅनेजमेंटने काहीही केलं नाही. मॅनेजमेंट बिल्डरचं नाव घेतात आणि बिल्डरने हात वर केले आहेत. बिल्डिंगमधली वयस्कर लोक ही घटना घडल्यानंतर मला भेटून सांगत आहेत की याबद्दल कधीपासून तक्रार करत आहोत. आता कोणाचा जीव गेल्यावरच लक्ष देणार का? नशीब आग माझ्या फ्लॅटमध्ये लागली. पण, जर पूर्ण बिल्डिंगमध्ये लागली असती तर काय केलं असतं?", असा प्रश्नही शिवने उपस्थित केला.