बिग बॉस मराठीमधील हे प्रसिद्ध कपल लग्नाआधीच करतेय काश्मीरमध्ये व्हॅकेशन एन्जॉय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 18:32 IST2019-11-27T18:24:46+5:302019-11-27T18:32:47+5:30

Bigg Boss Marathi: आता ते दोघे लग्न कधी करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Shiv thakare and veena jagtap enjoying vacation in jammu kashmir | बिग बॉस मराठीमधील हे प्रसिद्ध कपल लग्नाआधीच करतेय काश्मीरमध्ये व्हॅकेशन एन्जॉय!

बिग बॉस मराठीमधील हे प्रसिद्ध कपल लग्नाआधीच करतेय काश्मीरमध्ये व्हॅकेशन एन्जॉय!

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपून जवळजवळ दोन महिने उलटून गेले आहेत.  सीझनची चर्चा अद्याप होताना पाहायला मिळते आहे. याचं कारण आहे यंदाच्या सीझनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं अफेयर. बिग बॉस मराठी २ च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर त्यावेळी बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरू झाला आहे.

बिग बॉस मराठी २ शो संपल्यानंतर आता वीणा आणि शिव यांची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. वीणा आणि शिवने त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकतेच जम्मू-काश्मीरमधले व्हॅकेशन एन्जॉय करतानाचा फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये वीणा आणि शिव काश्मिरी ड्रेसमध्ये दिसतायेत.  या फोटोसोबत वाणीने इशारों इशारों में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा कहाँ से असे गाणं कॅप्शन म्हणून दिले आहे. 


शिव आणि वीणा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते. घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला लग्नाविषयी विचारले असता त्याने सांगितले होते की, आता घराबाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे. आता ते दोघे लग्न कधी करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Web Title: Shiv thakare and veena jagtap enjoying vacation in jammu kashmir