शिव ठाकरे- वीणा जगतापचे झाले ब्रेकअप?; याबाबत अभिनेत्याने केला 'हा' खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 07:00 IST2021-12-16T07:00:00+5:302021-12-16T07:00:00+5:30

वीणाने (Veena Jagtap) शिवचा (Shiv Thakare) टॅटू मिटवला असून या दोघांचे ब्रेकअप झाले अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

Shiv Thackeray- Veena Jagtap had a breakup ?; The actor revealed 'yes' about this | शिव ठाकरे- वीणा जगतापचे झाले ब्रेकअप?; याबाबत अभिनेत्याने केला 'हा' खुलासा

शिव ठाकरे- वीणा जगतापचे झाले ब्रेकअप?; याबाबत अभिनेत्याने केला 'हा' खुलासा

अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) महिनाभरापूर्वी लेहच्या ट्रीपवर गेली होती...तेव्हा समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटो नुसार वीणाने काढलेला शिवचा टॅटू कुठे दिसत नव्हता. त्याजागी हातावर पान दिसत होते. त्यामुळे वीणाने शिवचा टॅटू मिटवला असून या दोघांचे ब्रेकअप झाले अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यावर शिव ठाकरेने (Shiv Thakare) नुकताच खुलासा केला आहे.

शिव ठाकरने या टॅटूबद्दल मला काही माहित नसल्याचे सांगितले सोबतच मी माझ्या कामामध्ये खुश आहे आणि ती तिच्या कामामध्ये खुश आहे. आमच्या दोघांवर बाप्पाची कृपा आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे किंवा त्यांचे ब्रेकअप झाले असेल. कारण त्याने वीणा बद्दल जास्त बोलणे टाळले आहे.


बिग बॉस मराठी २ च्या घरात असताना शिव आणि वीणाच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. शो संपल्यानंतर या दोघांनी त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला होता. त्यांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूप आवडत होती. अनेकदा रोमँटिक डेटवर, कधी एकत्र भटकंती, तर कधी पार्टीमध्ये ते दोघे एकत्र दिसायचे. पण आता हे दोघे एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे त्या दोघांचे ब्रेकअप झाले असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Shiv Thackeray- Veena Jagtap had a breakup ?; The actor revealed 'yes' about this