‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे अविवाहीत, या कारणामुळे केले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 16:12 IST2020-12-17T16:12:07+5:302020-12-17T16:12:51+5:30

शिल्पा शिंदे हिचे नाव 'बिग बॉस 11' सिझनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक बनली होती. विजेतेपदासाठी सगळ्यात आघाडीवर तिचेच नाव होते.

Shilpa Shinde's mother reveals why her marriage with Romit Raj was called off | ‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे अविवाहीत, या कारणामुळे केले नाही लग्न

‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे अविवाहीत, या कारणामुळे केले नाही लग्न

भाभीजी फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिचे नाव 'बिग बॉस 11' सिझनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक बनली होती. विजेतेपदासाठी सगळ्यात आघाडीवर तिचेच नाव होते. बिग बॉस शोमध्ये सहभागी झाल्यानंतर शिल्पा शिंदेच्या खाजगी आयुष्याविषयीही तुफान चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी तिचे ठरलेले लग्न मोडल्या चर्चाही ऐकायला मिळाल्या.

शिल्पा शिंदेची आई गीता बिग बॉसच्या घरात आल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रेमळ वागणुकीने सा-यांची मनं जिंकली होती. तसंच खेळ खेळा मात्र खेळताना इतरांचाही मान राखा तसंच शिल्पाशी चांगलं वागण्याची विनंतीही त्यांनी केली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर गीता यांनीही घरातल्या सगळ्या स्पर्धकांचं कौतुक केलं. 

सर्वजण गेम खेळत असून कुणाबद्दलही वाईट मत किंवा राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याच वेळी त्यांना शिल्पा शिंदेच्या लग्नाबाबत विचारणा करण्यात आली. शिल्पा आणि तिचा बॉयफ्रेंड रोमित राज यांनी 2008 साली लग्नाचा निर्णय घेतला होता. रोमित हा चांगला मुलगा होतो त्यामुळे हे नातं सा-यांना मान्य होतं अशी माहिती गीता यांनी दिली. मात्र काही दिवसांनंतर लग्न करु नये असं शिल्पा आणि रोमित या दोघांनाही जाणवलं. 

त्यामुळे घटस्फोट घेण्यापेक्षा आधीच वेगळे झालेले चांगलं असा विचार करुन त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असंही गीता यांनी सांगितलं. यानंतर बरंच ऐकावं लागलं होतं अशी प्रतिक्रिया शिल्पानेही बिग बॉसच्या घरात दिली होती. 

लग्न असो किंवा कोणतीही गोष्ट दरवेळी पळ काढत असल्याचे तिने म्हटले होते. बिग बॉससोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याने इथून पळ काढणं शक्य नसल्याचंही तिने हसत हसत मान्य केले होते. रोमित राजनेही शिल्पाला जीवनात प्रत्येक गोष्टीपासून कायम पळ काढण्याची सवय असल्याचं विधान केले होते. या सवयीमुळे तिचे वैयक्तीक आणि व्यावसायिक नुकसान होत आहे असं तो म्हणाला होता.

Web Title: Shilpa Shinde's mother reveals why her marriage with Romit Raj was called off