'वाजले की बारा' लावणीवर थिरकली शिल्पा शेट्टी, 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:31 PM2024-03-15T15:31:47+5:302024-03-15T15:32:10+5:30

शिल्पा शेट्टी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे. या सोहळ्यात शिल्पा 'वाजले की बारा' या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.

shilpa shetty dance on vajale ki bara lawani song zee chitra gaurav award 2024 video | 'वाजले की बारा' लावणीवर थिरकली शिल्पा शेट्टी, 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ पाहा

'वाजले की बारा' लावणीवर थिरकली शिल्पा शेट्टी, 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ पाहा

अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून शिल्पाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबरच शिल्पा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. सुडौल शरीरयष्टी असणारी शिल्पा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शिल्पा शेट्टी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे. 

यंदाच्या 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील शिल्पाचा व्हिडिओ समोर आला आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पाने खास पैठणी नेसून पारंपरिक लूक केला आहे. हिरव्या रंगाची पैठणी आणि नाकात नथ घालत शिल्पाने मराठमोळा साज केल्याचं पाहायला मिळत आहे. झी चित्र गौरव सोहळ्यात शिल्पा शेट्टी लावणीवर थिरकली. 'वाजले की बारा' या लावणीवर शिल्पाने जबरदस्त डान्स केला. तिच्याबरोबर अमेय वाघही थिरकल्याचं व्हिडिओत दिसत आहे. 

शिल्पा शेट्टीबरोबर 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानदेखील हजर राहणार आहे. 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. 

Web Title: shilpa shetty dance on vajale ki bara lawani song zee chitra gaurav award 2024 video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.