शिबानी दांडेकरचा वर्ल्डकप फिव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 12:40 IST2016-03-20T19:32:26+5:302016-03-20T12:40:42+5:30

ही पोरगी साजूक तुपातील हिला नवºयाचा... टाइमपास 

Shibani Dandekar's World Cup Fever | शिबानी दांडेकरचा वर्ल्डकप फिव्हर

शिबानी दांडेकरचा वर्ल्डकप फिव्हर

पोरगी साजूक तुपातील हिला नवºयाचा... टाइमपास या प्रसिद्ध चित्रपटातील हे सुपरहिट आयटम सॉगने सर्व रसिकांच्या मनात जागा निर्माण केली होती. आज ही लग्नकार्यात, पार्टीत वगैरे या गाण्याची धूम आहे. पण या गाण्यावर ठेका धरणारी मराठमोळी सुंदर अभिनेत्री शिबानी दांडेकर हिला टी-२० वर्ल्ड कपचा फिव्हर चढला आहे. शिबानीने विविध सोशलमिडीयाच्या माध्यमातून हटके अशा अंदाजात इंडियन क्रिकेट टीमची जर्सी परिधान केलेला एक किल्क सोशलमिडीयावर अपडेट करून इंडिया टीमला प्रोत्साहन व शुभेच्छा देत आहे. शिबानीचे क्रिकेटप्रेम हे आपल्याला माहितच आहे. २०११ ते २०१५ या कालावधीत होणाºया आयपीएल मॅचेसमध्येदेखील शिबानीने होस्ट केले होते. यावेळी या मराठमोळी होस्टच्या प्रेमात संपूर्ण जग पडले होते. या क्रिकेट होस्टनंतरच शिबानीला टाइमपासमधील या झक्कास आयटम सॉगवर ठेका धरण्याची संधी मिळाली होती. राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय स्तरावर मराठमोळी शिबानाची ही कारर्कीद पाहता, नक्कीच अभिमान वाटेल
 

.
 

Web Title: Shibani Dandekar's World Cup Fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.